Google+ होणार बंद, तुमचं अकाऊंट डिलिट करताना 'या' गोष्टींचं भान ठेवा !

येत्या काही महिन्यामध्ये गूगलची Google+ही सेवा बंद होणार आहे.

File Photo

गूगल युजर्सची वैयक्तिक माहिती लीक होत असल्याने अखेर Google+ ची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीपासूनच Google+ मध्ये त्रुटी समोर आल्या होत्या. आता त्यामध्ये बग असल्याचं लक्षात आल्याने करोडो युजर्सची माहिती लीक होत आहे.

गूगलने युजर्ससाठी विविध टप्प्यांवर खास फीचर्स आणली आहेत. मात्र Google+ हे प्रोडक्ट अपेक्षेप्रमाण निकाल देऊ शकले नाही. युजर्सचे इमेल आणि नाव ही माहिती लीक होत आहे. येत्या काही महिन्यामध्ये गूगलची Google+ही सेवा बंद होणार आहे. यापूर्वीच तुम्हांला वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर Google+ अकाऊंट डिलिट करण्याची सोय देण्यात आली आहे.

Google+ अकाऊंट बंद कसं कराल ?

अकाऊंट बंद करण्यासाठी तुमच्या Google+ मध्ये जा.

Google+ मध्ये सेटिंग ऑप्शनमध्ये क्लिक करून Send feedback अ‍ॅन्ड Help वर क्लिक करा. त्यामध्ये दाखवल्यानुसार बदल करा.

सेटिंग बदलल्यानंतर पेजच्या खालच्या बाजूला अकाऊंट सेक्शनवर क्लिक करा.

त्यानंतर Delete your Google+ प्रोफाईलवर क्लिक करा.

Delete your Google+ वर क्लिक केल्यानंतर तुम्हांला काही सूचना दिल्या जातील. त्यानुसार माहिती तपासून Proceed हा पर्याय निवडावा.

Google+ प्रोफाईल डिलिट करण्यासाठी तुम्हांला कन्फर्मेशन द्यावे लागेल.

त्यानुसार Google+ मध्ये सेव्ह केलेली माहिती, फोटो, कॉन्टॅक्ट्स डिलिट न करता केवळ अकाऊंट डिलिट होईल.

तुमचं अकाऊंट डिलिट झाल्याची माहिती स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर सर्वे फॉर्म दिला जाईल.