OnePlus 9 सीरीज स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लिक; जाणून घ्या खास फिचर्स

नप्लसने त्याच्या आगामी OnePlus 9 सीरिजवर काम सुरू केले आहे. वनप्लस 9 सीरिज मार्च 2021 च्या आसपास लॉन्च केली जाऊ शकते. आता, वनप्लसच्या पुढील प्रमुख सीरिजच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांसह आणि मॉडेल नंबरशी संबंधित माहिती उघडकीस आली आहे.

OnePlus 9 series smartphone (PC - PTI)

OnePlus 9 Series Smartphones: वनप्लसने त्याच्या आगामी OnePlus 9 सीरिजवर काम सुरू केले आहे. वनप्लस 9 सीरिज मार्च 2021 च्या आसपास लॉन्च केली जाऊ शकते. आता, वनप्लसच्या पुढील प्रमुख सीरिजच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांसह आणि मॉडेल नंबरशी संबंधित माहिती उघडकीस आली आहे. टेकड्रोइडरने एका ताज्या अहवालात वनप्लस 9 सीरिजशी संबंधित माहितीचा खुलासा केला आहे. लिक झालेल्या माहितीनुसार, वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो अनुक्रमे LE2110 आणि LE2117, LE2119, LE2120 नावाने लॉन्च केले जाऊ शकतात.

वनप्लस 9 प्रो तीन प्रकारांमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. मॉडेल क्रमांकाची पहिली दोन अक्षरे 'Lemonade' या कोडनावातून असणार आहेत. काही दिवसांपूर्वी टिपस्टर मॅक्स जेने वनप्लस 9 प्रो साठी हे कोडनेम उघड केले होते.

याव्यतिरिक्त, टेकड्रोइडरने म्हटलं आहे की, कोडनेम LE2127 असणारे एक मिस्टीरियस डिव्हाइस देखील आढळले आहे. पण, ते वनप्लस 9 सीरिजशी संबंधित आहे की, नाही हे अद्याप हे निश्चित झाले नाही. चीनमधील एका वृत्तानुसार, वनप्लस 9 मालिकेत तीन मॉडेल्स लाँच करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार? तर 12 हजारांहून कमी किंमती मधील 'या' दमदार फोनबद्दल जरुर जाणून घ्या)

OnePlus 9 सीरिज स्पेसिफिकेशन्स -

वनप्लस 9 सीरिजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 875 प्रोसेसर, अमोलेड डिस्प्ले, डिस्प्लेवर मध्यभागी पंच-होल दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त, वनप्लसच्या पुढील फ्लॅगशिप सीरिजमध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन, आयपी 68 रेटिंग, एनएफसी, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स दिले जाऊ शकतात. अहवालानुसार वनप्लस 9 सीरिजमध्ये 65 वायर्ड चार्जिंग व्यतिरिक्त 40 वॅटचे वायरलेस चार्जिंग देखील देण्यात येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now