SONY कंपनीचा नवा TV बाजारात, किंमत फक्त 49 लाख रुपये

सांगितले जात आहे की, जगभरातील विविध देशांमध्ये हे टीव्ही या वर्षातील जून महिन्यांपर्यंत येऊ शकतील. उल्लेखनीय बाब अशी की, सोनीचे 8K वाला पहिला टीव्ही आणि या दोन्ही टीव्हीमध्ये X1 अल्टीमेट प्रोसेसर देण्यात आला आहे

Sony Master Series Z9G 98-Inch 8K HDR TV | (Photo Credit: Sony Website)

जपानी कंपनी सोनी कॉर्पोरेशन एक नवे टेलीव्हिजन (Television) मॉडेल बाजारात घेऊन आले आहे. Sony Master Series Z9G 98-Inch 8K HDR TV असे या टीव्हीचे नाव असून कंपनीने हा टीव्ही (TV) भारतातही नुकताच लॉन्च केला. प्राप्त माहितीनुसार, या टिव्हीची भारतातील किंमत सुमारे 70 हजार डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत तब्बल 49 लाख रुपये इतकी आहे. हा टीव्ही 98 इंच वाला 8 K टीव्ही आहे. सांगितले जात आहे की, हा पहिला अँड्रॉईड टीव्ही आहे. ज्यात 8K रेज्युलेसन मिळते. या अतिशय महागड्या टीव्हीसोबतच कंपनीने कमी किंमतीचा टीव्हीही लॉन्च केला आहे. ज्यात सोनी मास्टर सीरीज J9G8K HDR टीव्हीचा समावेश आहे. भारतात या टीव्हीची किंमतही 9 लाख रुपये आहे. यात 85 इंचाचे पॅनल मिळते.

Sony Master Series Z9G 98-Inch 8K HDR आणि J9G8K HDR हे दोन्ही टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटींग सिंस्टम (OS) प्लॅटफॉर्मवर चालतात. हे टीव्ही वर्षभर वापरल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेशनच्या माध्यमातून यावर होमकीट आणि एअलप्ले २ सुद्धा सपोर्ट करेन. सांगितले जात आहे की, जगभरातील विविध देशांमध्ये हे टीव्ही या वर्षातील जून महिन्यांपर्यंत येऊ शकतील. उल्लेखनीय बाब अशी की, सोनीचे 8K वाला पहिला टीव्ही आणि या दोन्ही टीव्हीमध्ये X1 अल्टीमेट प्रोसेसर देण्यात आला आहे. (हेही वाचा, Xiaomi घेऊन येत आहे दोन्ही बाजूंनी पाहता येणारा टीव्ही; उद्या लॉन्च होण्याची शक्यता)

8K अँड्रॉईड टीव्ही मॉडेल्सशिवाय जूनमध्ये सोनी 4KS वाला अँड्रॉईड टीव्हीही लॉन्च करेन. दरम्यान, कंपनीने हे टीव्ही 55 इंच स्क्रिनपेक्षा छोटे असणार नाहीत. दरम्यान, सोनीच्या नव्या 8K वाल्या टीव्हीची किंमत आणि उपलब्धता याबाबत फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबर कंपनीने मास्टर सीरीज ए9एफ ब्राविया ओएलइडी टीव्ही देशात लॉन्च केला होता. या टव्हीमध्ये सोनी एक्स 1 अल्टीमेट प्रोसेसर देण्यात आला आहे. यात प्रीमियम टीव्ही मध्ये नेटफ्लिक्स कॅललिब्रेटेड मोड, वन स्लेट डिजाईन सोबतच अकूस्टीक सरफेस ऑडिया सोबत टेक, पिक्सल कंट्रास्ट बूस्टर आणि इतर फीचर्सही दिले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now