Solar Eclipse, Lunar Eclipse in October 2023: ऑक्टोबर महिन्यात दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण; जाणून घ्या तारीख, सुतक कालावधी आणि इतर तपशील

वैदिक ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन्ही दृष्टीकोनातून ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. भारतामध्ये ग्रहण हे शुभ मानले जात नाही.

Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

यंदा 2023 मध्ये, काही दुर्मिळ सुपरमूनसह अनेक पौर्णिमा दिसल्या. आता पुन्हा या महिन्यात दोन खगोलीय घटना घडणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण (Solar & Lunar Eclipses) पाहायला मिळेल. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सारख्या वैज्ञानिक घटनांचे भारतामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण शारदीय नवरात्रीच्या एक दिवस आधी, म्हणजेच शनिवारी, 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. हा दिवस सर्वपित्री अमावस्या आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. याशिवाय शिवाय 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहणही होणार आहे.

अशाप्रकारे या वर्षी 2023 मध्ये एकूण चार ग्रहणे होतील. वैदिक ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन्ही दृष्टीकोनातून ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. भारतामध्ये ग्रहण हे शुभ मानले जात नाही. विज्ञानानुसार, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यावेळी चंद्र सूर्याचा काही किंवा सर्व प्रकाश पृथ्वीवर येण्यापासून रोखतो, तर जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राच्या पृष्ठभागावर आपली सावली टाकते तेव्हा चंद्रग्रहण होते.

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 02:25 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, ग्वाटेमाला, मेक्सिको, अर्जेंटिना, कोलंबिया, क्युबा, पेरू, उरुग्वे, अँटिग्वा, जमैका, हैती, पॅराग्वे, ब्राझील, डॉमिनिका, बहामास, बार्बाडोस इत्यादी ठिकाणी दृश्यमान असेल. (हेही वाचा: Global Mobile Speed Ranking: 5G स्पीडमुळे मोठी क्रांती, भारत इंटरनेट विश्वात शेजारी राष्ट्रेच नव्हे तर G-20 देशांच्याही पुढे)

देशात चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी रात्री 1.05 पासून सुरू होईल आणि रात्री 2.23 वाजता संपेल. भारतात ग्रहणाचा कालावधी 1 तास 16 मिनिटे असेल. हे ग्रहण भारतात दिसणार असून त्याचा सुतक कालावधी वैध असेल. सुतक कालावधी एक दिवस अगोदर सुरू होणार असून, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:05 वाजता मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. यानंतर ग्रहणानंतरच मंदिर उघडले जाईल. भारतामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाबाबत अनेक प्रकारच्या समजुती आहेत. असे मानले जाते की ग्रहण काळात पूजा, शुभ कार्य, स्वयंपाक आणि खाणे तसेच  गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.



संबंधित बातम्या