स्मार्टफोन खरेदी करताय, 13 हजार रुपयांनी कमी झाली 'या' स्मार्टफोनची किंमत
'या' स्मार्टफोनची किंमत चक्क 13 हजार रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे,
स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या चढाओढीमध्ये मोठ्या ब्राँन्ड्सच्या कंपन्यानी त्याच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे या बड्या कंपन्यांच्या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. तर किंमत कमी केलेल्या किंमतीत सॅमसंग, शाओमी, आणि एलजी कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. 'या' स्मार्टफोनची किंमत चक्क 13 हजार रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे,
Samsung Galaxy Note 8
सॅमसंग कंपनीच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत 13 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 2017 मध्ये लाँन्च करण्यात आलेल्या गेलेक्सी नोट 8 ची सध्या किंमत 42,999 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी नोट 8 ची किंमत सुरुवातीला 55,999 रुपये ठेवण्यात आली होती.
LG V30+
एलजी कंपनीच्या या स्मार्टफोनच्या मॉडेलला 40,999 रुपयांच्या किंमतीवर लाँन्च करण्यात आला होता. आता LG V30+ वर 11 हजार रुपये कमी केले असून ग्राहकांना तो 29,999 रुपयांना विकत घेता येणार आहे. तसेच अॅमेझॉन कंपनी ऐक्सेंज ऑफरमध्ये या स्मार्टफोनसाठी 8950 रुपयांची सूट देत आहे.
Samsung A9 2018
चार कॅमेरासह असणाऱ्या सॅमसंग कंपनीच्या या मॉडेलची किंमत 6000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. प्रथम Samsung A9 ची किंमत 39,999 रुपये ठरविण्यात आली होती. मात्र स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आल्याने तो आता 33,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
Vivo Nex
Vivo कंपनीचा सेल्फीसाठी ग्राहकांकडून जास्त खरेदी केला जाणारा विवो नेक्स 2018 मध्ये 44,990 रुपयांच्या किंमतीवर लाँन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 5000 रुपयांनी कमी करण्यात आली असून 39,990 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
जर आता तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या विचार करत असाल तर वरील स्मार्टफोनची किंमत सर्वांच्या खिशाला परवडणारी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच या कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करा.