Skullcandy Spoke वायरलेस इअरबड्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत
Skullcandy यांनी त्यांचे Skullcandy Spoke वायरलेस इअरबड्स भारतात लॉन्च केले आहेत. या नव्या एअरबड्ससाठी दमदार बॅटरी दिली गेली आहे. जी सिंगल चार्जमध्ये चार तासांचा बॅकअप देते. त्याचसोबत इअरबड्सच्या चार्जिंग केसमध्ये LED इंडिकेटर सुद्धा दिले आहे. या व्यतिरिक्त इअरबडला टच कंट्रोल सपोर्ट ही दिला गेला आहे. Skullcandy Spoke ची खरी किंमत 7999 रुपये आहे. मात्र ग्राहकांना लिमिटेड ऑफर अंतर्गत कंपनीच्या अधिकत वेबसाइटवरुन फक्त 2999 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. हे इअरबड्स 5 नोव्हेंबर पासून ग्राहकांना ब्लॅक रंगाच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे.(Portronics ने भारतात लॉन्च केले Bluetooth Receiver आणि Transmitter Adaptor, जाणून घ्या खासियत)
कंपनी ने Skullcandy Spoke इयरबड मध्ये पॉवरफुल बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जमध्ये चार तास बॅटरी बॅकअप देणार आहे. त्याचसोबत इअरबड मध्ये गो सोलो फिचर ही दिले आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी ने Skullcandy Spoke इयरबड चा वापर करता येणार आहे. तसेच टच कंट्रोल ते अॅक्टिव्ह असिस्टेंट पर्यंत सपोर्ट दिला गेला आहे. अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी ने Skullcandy Spoke इयरबड मध्ये 8mm च्या ड्रायव्हरसह कनेक्टिव्हिटीसाठी ब्लुटूथ वर्जन 5 दिले आहे. या इअरबडसाठी IPX4 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच हे इअरबड वॉटर आणि स्वेट प्रुफ आहे.(Moto G 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)
तसेच भारतीय बाजारात कंपनी ने Skullcandy Spoke इयरबडची थेट टक्कर Realme Buds Q सोबत येणार आहे. रिअलमी बड्स क्यू ची किंमत 1999 रुपये आहे. याचा आकार कॅप्सुल सारखा असून चार्जिंग केस मायक्रो USB सोबत येणार आहे. मात्र यामध्ये Buds Air अंतर्गत कोणतेच वायरलेस चार्जिंग मिळणार नाही आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे इअरबड्स चार्जिंग केससह सिंगल चार्जमध्ये तुम्हाला 20 तासांपर्यंत फुल प्लेबॅक देणार आहे. तर चार्जिंग केस शिवाय 4.5 तास सातत्याने वापर करता येणार आहे. इअरबड्समध्ये रिअलमी लिंक अॅप, सुपर स्लो लँटेसी मोड, टच कंट्रोल आणि ब्लुटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स दिले आहेत.