Security Tips: तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' फंक्शन लगेच करा बंद, हॅकर्सकडून डेटा चोरी होण्याची शक्यता

सध्या बाजारात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यामधील 50 टक्कांपेक्षा अधिक युजर्सकडे Android ओरियो 8.0 किंवा त्यावरील Android वर्जन असणारे स्मार्टफोन आहेत. नुकत्याच Y. Shafranovich नावाच्या एका संशोधकााने या बगचा खुलासा केला आहे

Security Tips: तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' फंक्शन लगेच करा बंद, हॅकर्सकडून डेटा चोरी होण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

सध्या बाजारात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यामधील 50 टक्कांपेक्षा अधिक युजर्सकडे Android ओरियो 8.0 किंवा त्यावरील Android वर्जन असणारे स्मार्टफोन आहेत. नुकत्याच Y. Shafranovich  नावाच्या एका संशोधकााने या बगचा खुलासा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, हॅकर्स OnePlus, Samsung, Vivo, Oppo सारख्या अॅन्ड्रॉइड 8 वरील स्मार्टफोन्सला NFC बीमिंगच्या माध्यमातून टारगेट करतात. एनएफसी बीमिंगच्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये मॅलवेअर अटॅक करतात. अॅन्ड्राइड 8 किंवा त्याच्यापेक्षा दिक ऑपरेटिंग सिस्टम डिवाइसमध्ये आलेल्या एका बगमुळे हॅकर्स मॅलवेअरच्या माध्यमातून युजर्सचा डेटा चोरी करतात. तर मॅलवेअर जेव्हा दोन डिवाइस एकमेकांच्या आसपास असल्यास अॅन्ड्रॉइड बीम ऑटोमॅटिक पद्धतीने एका दुसऱ्याच डिवाइसचा उपयोग करुन डेटा कॉपी करतात.

दरम्यान गुगलकडून हा बग ठीक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र युजर्सला काही गोष्टींबाबत सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे. अॅन्ड्रॉइड बीमच्या माध्यमातून अॅप इन्स्टॉलेशन फाइल म्हणजेच APK फाइल म्हणतात त्यामधून चोरी केली जाऊ शकते. याच बगमुळे अॅन्ड्रॉइड युजर्सचा डेटा जेव्हा एका स्मार्टफोनमधून दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर होत असताना युजर्सला मिळणारा Warning Message हा बग पुढे पास केला जातो. त्यामुळे युजर्सला आपला डेटा चोरी केला जात आहे हे सुद्धा  कळत नाही. गुगलने ऑक्टोबर 2019 मध्ये युजर्सला या बग पासून वाचवण्यासाठी सिक्युरिटी अपडेट सुद्धा देण्यात आले होते.(मोबाईल Privacy बाबत चिंता? या पद्धतीने जाणून घ्या कोणत्या App मधून डेटा लीक होतोय)

या बगपासून वाचण्यासाठी सर्वात प्रथम वाचण्यासाठी युजर्सला त्यांच्या डिवाइस मधील गुगलच्या लेटेस्ट सिक्युरिटीसाठी आलेले अपटेड पहावे लागणार आहे. ज्या युजर्सकडे अॅन्ड्रॉइड वन किंवा स्टॉक अॅन्ड्रॉइड असणारा फोन असल्यास मॅन्युफ्रॅक्चर्सद्वारे देण्यात आलेले अपडेट डाऊन करावे लागणार आहे. जर तुम्ही हे अपडेट डाऊनलोड न केल्यास एनएफसी तुम्ही स्विच ऑफ करा. सध्या हे बग फक्त एनफसी इनबिल्ट डिवाइस मध्ये काम करते. त्यामुळे ज्या युजर्सच्या डिवाइसमध्ये एनफसी फिचर नसल्यास त्यांचासाठी धोका ठरणार नाही आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us