World UFO Day 2020: भारतासह जगभरात अनेक वेळा दिसली उडती तबकडी; वर्ल्ड यूएफओ डे निमित्त घ्या जाणून
हॉकिंग्ज याच विषयावर संशोधनही करत होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यू झाला. त्यांना यश येऊ शकले नाही.
World UFO Day 2020: आजचा दिवस (2 जुलै) जगभरात वर्ल्ड यूएफओ डे (World UFO Day) म्हणून साजरा केला जातो. आकाशात दिसणाऱ्या अज्ञात वस्तुला अनआयडेंटीफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट (Unidentified flying object) म्हणून ओळखले जाते. मराठीमध्ये याला 'उडती तबकडी; असेही म्हटले जाते. अशा यूएफओ बाबत माहिती आणि जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो. अनेकांचा दावा असा आहे की, या सृष्टीत केवळ मानव आणि पृथ्वी एकमेव नाही. दुसरीही एखादी पृथ्वी असू शकते किंवा सृष्टीतील एखाद्या उपग्रहावर अशीच जीवसृष्टी असू शकते. जी, पृथ्वीवर आणि मानवाच्या हालचालींवर लक्ष ठेऊ शकते. अनेक वेळा दिसणाऱ्या उडत्या तबकड्या हा सुद्धा त्यातलाच प्रकार असावा असे अनेकांना वाटते. जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी या आधीच दावा केला आहे की, पृथ्वीवरील मानव आणि एलियन्स यांचा लवकरच सामना होईल. हॉकिंग्ज याच विषयावर संशोधनही करत होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यू झाला. त्यांना यश येऊ शकले नाही.
यूएफओ कधीपासून दिसू लागले आहेत?
वैज्ञानिकांचे दावे आणि इतिहास पाहिला तर साधारण 1920 पासून आकाशात उडत्या तपकड्या (UFO) दिसल्याच्या नोंदी आढळतात. अर्थात प्राचिन काळीही अशा तबकड्या पाहिल्याचे बोलले, सांगितले जाते. मात्र, 40 च्या दशकात अशी चर्चा सुरु झाली की, यूएफओ ही सोव्हियत राष्ट्रसंघाची देन आहे. सोव्हियत राष्ट्रसंघाचे हे एक खास आकाराचे विमान असून, ते जगभरात दिसते असेही मानले जाते. मात्र, विज्ञान संशोधन फार पुढे गेले. हे विमान वैगेरे काहीच नसल्याचेही पुढे आले. दरम्यान, अमेरिकेने मात्र अशा प्रकारच्या उडत्या तबकड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक खास विभागच निर्माण केला. दरम्यान, अमेरिका आणि इंग्लंड गेली अनेक वर्षे याबाबत संशोधन करत आहेत. मात्र, अद्याप तरी त्यांना यश आले नाही. (हेही वाचा, सूर्याचा पृष्ठभाग कसा दिसतो पाहिलात काय? पहिल्यांदाच स्पष्ट फोटो; जणू मधमाशीचे पोळेच)
भारतातही अनेकदा दिसलीय उडती तबकडी
- अशा प्रकारची उडती तबकडी भारतातही अनेकदा दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्या दाव्यातील सत्यता मात्र उद्याप पडताळता आली नाही. तसेच, या दाव्याला पुष्टी मिळेल असेही फारसे काही हाती आले नाही. मात्र, दावा करण्यात आला आहे की 15 मार्च 1951 मध्ये सकाळी 10.20 वाजता नवी दिल्ली येथील 25 सदस्यांच्या फ्लाइंग क्लबला आकाशात एक विचित्र वस्तू उडताना दिसली. जी शेकडो फूट लांब होती. ही वस्तू दिसली आणि पाहता पाहता गायबही झाली.
- 29 ऑक्टोबर 2008 मध्येही कोलकाता येथे रात्री 03.30 ते सकाळी 06.30 या काळात आकाशात एक तेजपूंज अशी वस्तू दिसली. हँडीकॅम कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्रही काढण्यात आले. पहिल्यांदा ही वस्तू गोलाकार, मग त्रिकोणी आणि पुन्हा ती एका सरळ रेशेत पाहायला मिळाली. ही वस्तू एक विशिष्ट असा चमकदार प्रकाश टाकताना दिसली. ही वस्तू अनेकांनी पाहिली. इतकेच नव्हे तर ती वस्तू पाहण्यासाठी अनेकांनी गर्दीही केल्याचे सांगितले जाते. कोलकाता एमपी बिरला प्लेनेटोरियमचे संचालक डॉ. पीडी दुराई यांनीही याची पुष्टी केली आहे.
- 20 जून 2013 मध्येही चेन्नई येथील मोगाप्पियर येथील नागरिकांनी रात्री 08.55 वाजता आकाशात नारंगी रंगाची चमकणारी वस्तू पाहिली. याबाबतचे वृत्त 23 जूनच्या स्थानिक वृत्तपत्रांनी छापले होते.
- भारत चीन सीमेवर लद्दाक परिसरात चीनकडील बाजूलाही 2013 च्या ऑगस्ट महिन्यात दोन्ही लष्कारांना अशाच प्रकारची काही वस्तू पाहिला मिळाली. जी गोलाकार होती आणि पिवळ्या रंगाचा प्रकाश सोडत होती. ही वस्तू इथे साधारण 5 तास पाहायला मिळाली. (हेही वाचा, अपोलो 11 अंतराळ मोहिम: NASA ची पहिली चंद्रमोहिम आणि Apollo 11 यानाबद्दल जाणून घ्या '8' महत्त्वाच्या गोष्टी)
- 2014 मध्येही अहमदबाद येथे आकाशात 26,300 फूट उंचीवर जेट एअरवेजच्या महिला वैमानिक महिमा चौधरी यांनी यूएफओ पाहिल्याचा दवा केला आहे. हा यूएफओ हिरवट रंगाचा होता. महिमा चौधरी या विमान घेऊन पुण्याहून अहमदाबादला निघाल्या होत्या. दरम्यान, त्यानंतरही अनेकदा उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा करण्या आला आहे.
दरम्यान, नासा आणि इतरही अनेक आंतराळ संस्थांनी म्हटले आहे की मंगळ गृहावर मानवी वस्ती आहे. सुर्यमालेतूनच कोणत्या तरी एखाद्या गृहावरुन एलियन्स येतात. नासाच्या ग्रह विज्ञान विभागाचा दावा आहे की, सौरमालेतील 4 गृहांवर जीवसृष्टी आहे. लवकरच ही जीवसृष्टी शोधून काढण्यात मानवाला यश येऊ शकेल. जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या उडत्या तबकड्या म्हणजेच यूएफओ पाहायला मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यात किती तथ्य आणि किती कल्पना हे येणारा काळच सांगू शकेल.