Super Snow Moon 2019: आज होणार यंदाच्या वर्षातील सगळ्यात मोठ्या चंद्राचं दर्शन, इथे पहा भारतातील सुपरमूनचं Live Streaming!
भारतामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 7 नंतर सूपर स्नो मूनचं दर्शन होणार आहे.
Super Snow Moon 2019 Live Streaming: माघ पौर्णिमा (Magh Pournima) म्हणजे आज 19 फेब्रुवारी 2019 च्या संध्याकाळी भारतीयांना सूपर स्नो मूनचं (Super Snow Moon) दर्शन होणार आहे. प्रामुख्याने विज्ञान आणि खगोलीय घटनांबद्दल कुतूहल असणार्यांसाठी आजचा दिवस खास आहे. कारण आज चंद्र इतर दिवसांच्या तुलनेत 14% अधिक मोठा आणि 30% अधिक चमकदार दिसणार आहे चंद्राचं आजचं विलोभनीय रूप थेट डोळ्यांनी पाहता येणार आहे. यासाठी तुम्हांला दुर्बिणीची मदत होणार आहे. पण यासोबतच ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातूनही सुपर स्नो मून पाहता येणार आहे. त्यासाठी खालील लिंकवर नक्की क्लिक करा. Super Snow Moon 2019: आज रात्री घडेल वर्षभरातील सर्वात मोठं चंद्रदर्शन; सुपरमून कुठे, कधी पहाल?
कोणत्या वेळेत दिसणार सुपर स्नो मून?
भारतामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 7 नंतर सूपर स्नो मूनचं दर्शन होणार आहे. आज रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी जगभरातून या सूपरमूनचे दर्शन घडेल. चंद्र-पृथ्वी मधील अशी स्थिती पुन्हा 2026 मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजची संधी मुळीच दडवू नका.