Sunita Williams Returns: सुनिता विल्यम्स चा परतीचा प्रवास सुरू; पहा कधी, कुठे उतरणार पृथ्वीवर?
सुनिता विल्यम्स सोबत परतणार्यांमध्ये Butch Wilmore हा त्यांचा साथीदार, नासा चा अंतराळवीर Nick Hague आणि रशियन अंतराळवीर Aleksandr Gorbunov आहे.
अवकाशामध्ये 9 महिन्यांपासून अडकलेली Sunita Williams आणि Butch Wilmore यांचा परतीचा प्रवास अखेर सुरू झाला आहे. SpaceX Dragon spacecraft मध्ये त्यांच्यासोबत अजून अन्य 2 Crew-9 members आहेत. 19 मार्चला 3वाजून 30 मिनिटं IST ला फ्लोरिडा मध्ये Gulf of America (ex- Gulf of Mexico) मध्ये येणार आहेत. ISS मध्ये Sunita Williams आणि Butch Wilmore मागील वर्षी जून महिन्यापासून अडकले होते. Boeing Starliner spacecraft,मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास रखडला होता. पण आता 17 तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर परतणार आहेत.
पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना आव्हान कशाचे?
सुमारे नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याच्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. त्यांच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुनीता विल्यम्स यांनी अधिकृतपणे रशियन अंतराळवीर Alexey Ovchinin यांच्याकडे आयएसएसचे नेतृत्व सोपवले, जे पुढील सहा महिने ऑपरेशन्सचे नेतृत्व करतील.
कुठे पाहू शकाल लाईव्ह स्ट्रिमिंग?
NASA त्यांच्या अधिकृत लाईव्ह स्ट्रीमद्वारे सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवरील परतीचे रिअल-टाइम कव्हरेज दाखवणार आहे. त्यामुळे नासा ची वेबसाईट, युट्युब चॅनेल वर तुम्हांला लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)