Strawberry Moon Eclipse 2020: आज रात्री लागणाऱ्या चंद्रग्रहणाला 'या' कारणामुळे 'Strawberry Moon' म्हटले जाते
त्यामुळेच या ग्रहणाला Strawberry Moon असे म्हटले जाते.
आजच्या दिवशी म्हणजेच 5 जूनला रात्री लागणारे ग्रहण हे एका स्ट्रॉबेरीसारखे लाल असणार आहे. त्यामुळेच या ग्रहणाला Strawberry Moon असे म्हटले जाते. तसेच या वर्षातील जून महिन्यातील चंद्रग्रहणाला हे नाव दिले आहे कारण, या ऋतूमध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीची कापणी केली जाते. त्यामुळेच त्याला स्ट्रॉबेरी मून असे ही संबोधले जाते. timeanddate.com यांच्या एका रिपोर्टनुसार, जुन्या काळात लोक ऋतूमध्ये होणारा बदल ट्रॅक करण्यासाठी चंद्राचा आधार घेत असत. याच आधारावर आजच्या काळात वर्षाच्या 12 महिन्यांचे कॅलेंडर बनवण्यात आले आहे. त्यावेळी संपूर्ण युरोपातील लोकांसह मूळ अमेरिकेतील लोकांनी उत्तर गोलार्धात ऋतूसंबंधित सुविधांच्या नावावर महिन्यांची नावे ठेवली.
अमेरिकेत जून मध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतीची कापणी केली जाते. याच कारणामुळे जून मध्ये दिसणाऱ्या Full Moon ला स्ट्रॉबेरी मून असे ही म्हटले जाते. तर आज दिसणारे ग्रहण हे जगातील काही भागात दिसून येणार आहे. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, अफ्रिका, युरोपातील देश, अटलांटिक,एशिया आणि अंटार्टिका येथे पहायला मिळणार आहे.(How to Watch Strawberry Moon Eclipse Live Streaming Online in India: आज घरबसल्या छायाकल्प चंद्रग्रहण कधी आणि कुठे पाहू शकाल?)