Stephen Hawking 80th Birthday Google Doodle: स्टीफन हॉकिंग यांच्या 80 व्या जयंती निमित्त गूगलचं खास डूडल (Watch Video)

University of Cambridge मधून त्यांनी नंतर पीएचडी केली.

Stephen Hawking Google Doodle| PC: Google Homepage

स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) जर आज असते तर ते आज 8 जानेवारी 2022 दिवशी आपला 80 वा वाढदिवस साजरा करत असते. आज ते आपल्या जगात नसले तरीही त्यांच्या विश्वशास्त्र (Cosmology) आणि भौतिकशास्त्र (Physics) याविषयामधील योगदान बहुमोलाचे आहे. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आज जगातील आघाडीचं सर्च इंजिन गूगलने (Google)  देखील स्टीफन हॉकिंग यांच्या 80 व्या जयंती निमित्त (Stephen Hawking 80th Birthday) खास डुडल (Doodle) साकारले आहे. त्यांच्या जीवनाचा लेखाजोखा गूगलने एका खास व्हिडिओ द्वारा आज डूडल वर प्रदर्शित केला आहे. कम्प्युटर जनरेटेड व्हॉईस देखील त्यामध्ये वापरण्यात आला आहे.

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 1942 साली इंग्लंडच्या ऑक्सफर्ड मध्ये झाला. ते कायमच 'युनिव्हर्स' बाबत उत्सुक होते. त्यांना वयाच्या 21 व्या वर्षी amyotrophic lateral sclerosis (ALS)या Neurodegenerative Disease ने ग्रासले होते. हळूहळू त्यांची हालचाल मंदावली. बोलण्याची क्षमता त्यांनी गमावली. पण 1980 साली MIT engineer Dennis Klatt यांनी तयार केलेल्या कम्प्युटर जनरेटेड व्हॉईस द्वारा त्यांनी संभाषण सुरू ठेवले. आजच्या गूगल डूडलवरही त्यांच्या आवाजाची झलक आपण ऐकू शकतो. यामध्ये ते Black Holes बाबत बोलत आहेत. हे देखील नक्की वाचा: Dr. Kamal Ranadive Google Doodle: कमल राणादीव यांच्या 104 व्या जन्मदिनानिमित्त खास गूगल डूडल .

Stephen Hawking 80th Birthday Google Doodle

स्टीफन हॉकिंग हे ऑक्सफर्ड मधून फिजिक्स मध्ये बीए डिग्री घेऊन उत्तीर्ण झाले होते. University of Cambridge मधून त्यांनी नंतर पीएचडी केली. 'ब्लॅक होल' बाबत कमालीची उत्सुकता होती आणि त्यामध्येच त्यांनी पुढे संशोधन केले. एकीकडे विश्वशास्त्र मध्ये काम करीत असतानाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा देखील दिला.त्यांना 1979 मध्ये Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देऊनही गौरवण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif