Ozone Neutralized Coronavirus: ओझोन गॅसमुळे कोरोना व्हायरस होतो निष्क्रिय, जपानी शोधकर्त्यांचा दावा

फक्त भारतात कोरोना व्हायरसचे 33 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर 60 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याच दरम्यान, जपानच्या संशोधकांनी एक अनोख्या पद्धतीचा शोध लावला आहे. संशोधकांनी बुधवारी असे म्हटले आहे की, ओझोन गॅसमुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होण्याची क्षमता आहे.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोना व्हायरचे संकट अद्याप कायम आहे. फक्त भारतात कोरोना व्हायरसचे 33 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर 60 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याच दरम्यान, जपानच्या संशोधकांनी एक अनोख्या पद्धतीचा शोध लावला आहे. संशोधकांनी बुधवारी असे म्हटले आहे की, ओझोन गॅसमुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होण्याची क्षमता आहे. त्यामुळे जो रुग्णालयांसह बर्‍याच ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रभावी पध्दत बनू शकते.फुजिता हेल्थ युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिकांनी एका न्युज कॉफ्रेन्समध्ये असे म्हटले की, ओझोन गॅस 0.05 ते 0.01 पार्ट्स प्रति मिलियन (पीपीएम) च्या एकाग्रतेमध्ये व्हायरसचा खात्मा करु शकतो. चांगली गोष्ट म्हणजे, ओझोनचा हा स्तर नागरिकांसाठी सुद्धा हानिकारक नाही आहे.

या प्रयोगासाठी संशोधकांनी कोरोनो व्हायरसच्या नमुन्यांसह सीलबंद चेंबरमध्ये ओझोन जनरेटरचा वापर केला. प्राणघातक विषाणूला सुमारे 10 तास ओझोन पातळीवर ठेवल्यास विषाणूची शक्ती 90 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मुख्य संशोधक ताकायुकी मुराता यांनी असे सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी एकाग्रतेच्या ओझोन ट्रिटमेंटच्या वापरामुळे कमी केला जाऊ शकतो. ऐवढेच नाही तर लोकांच्या उपस्थितीत सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, उच्च आद्रतेच्या परिस्थितीमध्ये विशेष रुपात तो प्रभावी आहे.(Coronavirus Worldwide Update: जगभरात कोरोनाचे 2.38 कोटी रुग्ण, आजवरची रिकव्हर, मृत आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची सविस्तर आकडेवारी पाहा)

पहिल्या प्रयोगातून असे समोर आले की, ओझोनचा 1 ते 6 पीपीपएमचा स्तर कोविड19 च्या विरोधात प्रभावी आहे. परंतु नागरिकांसाठी तो टॉक्सिक आहे. ओझोन वॅक्सिनचे तीन परमाणू मिळून बनवण्यात येणारा ग्रीनहाउस गॅस जो हवेत कमी प्रमाणात (0.2%) उपलब्ध आहे. तो काही रोगांना सुद्धा निष्क्रिय करण्यासाठी सुद्धा मानला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif