Chandra Grahan 2023: आज वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार; पहा कसं, कधी, कुठे?

प्रामुख्याने गरोदर महिला,लहान मुलं, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती यांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

Lunar Eclipse | File Photo

आज 2023 वर्षामधील शेवटचं दिसणार आहे. सूर्याच्या परिक्रमेदरम्यान जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहणाची (Chandra Grahan) स्थिती निर्माण होते. ग्रहण ही सामान्य भौगोलिक घटना असली तरीही हिंदू धर्मीय ज्योतिषशास्त्रानुसार, त्याला फारसं शुभं मानत नसल्याने त्यासोबत अनेक रितीभाती देखील जोडल्या जातात. चंद्रग्रहणामध्ये ते सुरू होण्यापूर्वी काही तास आधी सूतक काळ देखील सुरू होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळेसोबत या सुतक काळामध्येही काही गोष्टी पाळाव्या लागतात. प्रामुख्याने गरोदर महिला,लहान मुलं, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती यांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

चंद्रग्रहण आणि सुतक काळ वेळ

आजचं चंद्रग्रहण मध्यरात्रीचं असल्याने 28/29 ऑक्टोबरच्या दरम्यान ते होणार आहे. रात्री 1 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणारं हे ग्रहण 2 वाजून 22 मिनिटांनी संपणार आहे. एकूण 1 तास 16 मिनिटांचं हे ग्रहण आहे. तर त्याचा सुतक काळ संध्याकाळी 4 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार आहे. आजचं चंद्रग्रहण भारतामधूनही दिसणार असल्याने त्याचे वेध भारतीय देखील पाळणार आहेत.

कुठे पहाल चंद्रग्रहण

आज कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण आले आहे. कोणतेही ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं हे योग्य नाही. त्यामुळे चंद्रग्रहण पाहतानाही काळजी घ्या. ग्रहण ऑनलाईन पाहण्याची सोय आहे. युट्युब वर आजचं चंद्रग्रहण पाहता येऊ शकतं.

चंद्रग्रहणात काय कराल?

ज्योतिषशास्त्रांमधील मान्यतांनुसार, सुतककाळ सुरू झाला की देवांची मंदिरं बंद केली जातात. चंद्रग्रहणाच्या वेळेत अन्नावर तुळशीपत्रं ठेवली जातात. अन्न शिजवणं टाळलं जातं.

टीप: हा लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवणं हा आमचा उद्देश नाही.