First Indian Space Tourist: पायलट Gopi Thotakura ठरले पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय; Jeff Bezos यांच्या Blue Origin द्वारे करणार प्रवास (Video)

गोपी यांना जेट पायलटिंग, बुश फ्लाइंग, एरोबॅटिक्स, सीप्लेन, ग्लायडर आणि हॉट एअर बलून पायलटिंगचा व्यावसायिक अनुभव आहे. याशिवाय, गोपीचंद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय विमाने उडवली आहेत.

Gopi Thotakura (संग्रहित संपादित प्रतिमा)

First Indian Space Tourist: भारतीय पायलट गोपीचंद थोटाकुरा (Gopichand Thotakura) हे पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक ठरणार आहेत. जेफ बेझोझ यांच्या ब्लू ओरिजिनच्या (Blue Origin) न्यू शेफर्ड-25 (NS-25) मिशनसाठी त्यांची निवड झाली आहे. गोपीचंद हे इतर पाच सदस्यांसह पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे प्रवास करतील. या क्रूमध्ये अमेरिकेच्या एड ड्वाइटचाही समावेश आहे, ज्यांची 1961 मध्ये प्रथम कृष्णवर्णीय अंतराळवीर उमेदवार म्हणून निवड झाली होती.

गोपीचंद थोटाकुरा हे एक उद्योजक आणि पायलट आहेत. ब्लू ओरिजिनने गोपी यांचे वर्णन, ‘गाडी चालवण्याआधीच उडायला शिकलेला माणूस’ म्हणून केले आहे.

गोपी यांना जेट पायलटिंग, बुश फ्लाइंग, एरोबॅटिक्स, सीप्लेन, ग्लायडर आणि हॉट एअर बलून पायलटिंगचा व्यावसायिक अनुभव आहे. याशिवाय, गोपीचंद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय विमाने उडवली आहेत. नुकतेच आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारोचे शिखर त्यांनी सर केले. त्यांनी फ्लोरिडा येथील एरोनॉटिकल विद्यापीठातून एरोनॉटिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि कोव्हेंट्री विद्यापीठातून एव्हिएशन/एअरवे मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्समध्ये एमबीए केले आहे. ते सध्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

न्यू शेफर्ड-25 मिशनसाठी निवडा झाल्यानंतर गोपीचंद म्हणतात, ‘मला अंतराळवीर होण्याची नेहमीच खूप उत्सुकता होती. यासाठी भारतात आणि परदेशात उड्डाण केल्यानंतर, मी विविध संधी शोधू लागलो. आता मला ब्लूसह ही संधी मिळाली आहे.’ नवीन शेफर्डची रचना खास अवकाश पर्यटनासाठी करण्यात आली आहे. सहा अंतराळवीर न्यू शेपर्डच्या प्रेशराइज्ड क्रू कॅप्सूलमध्ये बसतील जेथे प्रत्येक अंतराळवीराची स्वतःची विंडो सीट असेल. हे वाहन पूर्णपणे स्वायत्त असल्याने मिशनवर पायलट असणार नाही. (हेही वाचा: Robot 'Vyommitra' to Fly Into Space: गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात जाणार महिला रोबोट 'व्योममित्र'; जाणून घ्या काय आहे ISRO ची योजना)

न्यू शेपर्ड 25 मिशन हे कार्यक्रमाचे सातवे मानवयुक्त उड्डाण असेल. हे अंतराळ पर्यटनासाठी तयार करण्यात आले आहे. यात ब्लू ओरिजिनची पुन्हा वापरता येण्याजोगी सबऑर्बिटल रॉकेट प्रणाली वापरली जाईल. अंतराळवीर ॲलन शेपर्ड यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. ब्लू ओरिजिन वेबसाइटनुसार, न्यू शेफर्ड मिशन पर्यावरणपूरक आहे. या मिशनच्या प्रक्षेपणाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now