New ISRO Chief: इस्त्रो च्या प्रमुखपदी आता Dr V Narayanan येणार; 14 जानेवारीला स्वीकारणार पदभार
Dr V Narayanan 14 जानेवारीला कार्यभार स्वीकारणार आहेत. पुढील 2 वर्ष ते या पदावर राहणार आहेत.
डॉ. व्ही नारायणन (Dr V Narayanan) यांच्याकडे ISRO च्या प्रमुखपदाची जबाबदारी येणार आहे. Indian Space Research Organisation चे चेअरमन पदी ते आता विराजमान होतील आज 8 जानेवारी त्याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. S Somnath यांच्यानंतर आता ही जबाबदारी V Narayanan यांच्याकडे येणार आहे. 14 जानेवारीला नारायणन कार्यभार स्वीकारणार आहेत. पुढील 2 वर्ष ते या पदावर राहणार आहेत. त्यानंतर ते निवृत्त होतील.
Dr V Narayanan हे सध्या Director of the Liquid Propulsion Systems Centre आहेत. भारताच्या क्रायोजेनिक इंजिनच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे असे तंत्रज्ञान आहे जे एकेकाळी देशाला देण्यास नकार देण्यात आला होता. त्यांना रॉकेट आणि अंतराळ यानात तज्ञ मानला जातो. रॉकेट-क्षेपणास्त्र हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ असल्याचं म्हटलं जातं. Voice Calls via Smartphone From Space: आता पहिल्यांदाच अंतराळातून मोबाईल कॉल करता येणार; ISRO अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून रचणार इतिहास .
पहा V Narayanan यांची प्रतिक्रिया
नारायणन यांनी क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एमटेक आणि आयआयटी, खडगपूर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. M.Tech कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांना रौप्य पदक देखील देण्यात आले. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन तज्ज्ञ नारायणन 1984 मध्ये इस्रोमध्ये रुजू झाले आहेत. ते 2018 मध्ये लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक झाले. नारायण गेल्या ४ दशकांपासून रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन या क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)