Alien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स? जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा
Alien life encounter (Photo Credits: Pixabay)

एलियन्स आहेत की नाहीत? हा प्रश्नच मुळात वादग्रस्त आहे. पण David Huggins या व्यक्तीने चक्क एलियन्ससोबत सेक्स केल्यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी त्याची व्हर्जिनिटी गमावल्याचा धक्कादायक दावा केला आहे. David Huggins यांनी सांगितल्याप्रमाणे Crescent या एलियन्ससोबत त्यांनी सेक्स केला आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते माणसांप्रमाणेच एलियन्सचंदेखील अस्तित्त्व आहे पण आपण ज्याप्रकारे विचार करतोय तसेच ते दिसत असतील किंवा राहत असतील हा विचार चूकीचा आहे.

माणसासोबत सेक्स करून एलियंस काही हायब्रीड जातीच्या नव्या कुटुंबांना जन्म देऊ शकतात. The Sun या वृत्तपत्रकाने एलियन्ससोबत सेक्स केल्याच्या काही व्यक्त्तींची भेट घेतल्याचा दावा केला आहे.

David Huggins हे 75 वर्षीय असून त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सध्या ते अमेरिकेमध्ये राहतात. त्यांनी एका स्त्री एलियनसोबत सेक्स केला असून ती लाकडातून आली असं त्यांचं मत आहे. अनेक एलियन बेबीजचे ते पिता असू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. डेविड यांनी तिचं चित्रदेखील साकारलं आहे.

CeroFrance ही संस्था एलियन्ससोबत सेक्स झाल्याचा दावा करणार्‍या व्यक्तींसाठी काम करते. या संस्थेतील अनेक सदस्यांचा असा दावा आहे की लहानपणीचा त्यांच्यासोबत अशा काही घटना घडल्या की त्यामुळे अल्पवयातच त्यांची व्हर्जिनिटी हरवली.

परग्रहावरील काही व्यक्तींशी सेक्स झालेल्यांचा असा दावा आहे की एलियन्स मानवी स्पर्म्स आणि अंडी वापरून हायब्रीड रेस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. Hillary Potter या अशाच थिअरीवर विश्वास ठेवणार्‍या आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, ते एलियन-ह्युमन हायब्रीड बनवत असावेत.