Cold Moon 2020 Date and Timings: डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेच्या चंद्राला 'कोल्ड मून' का म्हणतात? जाणून घ्या यंदाच्या कोल्ड मूनची तारीख, वेळ
डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेच्या चंद्राला कोल्ड मून प्रमाणेच लॉंग नाईट्स मून असे देखील संबोधले जाते
वर्ष 2020 हे अनेकांसाठी कठीण प्रसंग घेऊन येणारं तर संयमाची परीक्षा घेनारं ठरलं पण थोडं रिलॅक्स होत तुम्ही या वर्षात अवकाश न्याहाळलं असेल तर तुम्हांला अनेक सुखद, काही दुर्मिळ अवकाश घटना देखील अनुभवायला मिळाल्या असतील. कधी ग्रहांची युती पाहिली असेल तर कधी ग्रहणांचा नजारा, आता 2020 ला निरोप देताना वर्षातल्या शेवटच्या पौर्णिमेला देखील तुम्ही चंद्राचं खास रूप पाहायला उत्सुक असाल तर जाणून घ्या या कोल्ड मून 2020 ची तारीख, कोल्ड मून 2020 (Cold Moon 2020) पाहण्याची वेळ आणि नेमकं याला कोल्ड मून का म्हणतात? या मागची कहाणी काय?
कोल्ड मून 2020 तारीख आणि वेळ
कोल्ड मून यंदा मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच 29 डिसेंबरला आहे. भारतामध्ये हा पौर्णिमेचा चंद्र 29 आणि 30 डिसेंबर दिवशी देखील पाहता येणार आहे. 30 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजून 58 मिनिटांनी तो पूर्ण आणि सर्वोच्च स्थितीमध्ये पाहता येणार आहे. रात्रीच्या वेळेत अवकाशात देखील तुम्ही तो पाहिल्यास थेट डोळ्यांनी दिसू शकतो.
कोल्ड मून का म्हणतात?
अमेरिकन ट्राईब्सच्या नावावरून किंवा ऋतूमधील बदलानुसार प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला काही विशिष्ट नाव देण्याची पद्धत आहे. डिसेंबर महिन्यात वातावरणात पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत थंडावा असल्याने या चंद्राला कोल्ड मून म्हणण्याची पद्धत आहे. Datta Jayanti 2020 Date: दत्त जयंती यंदा 29 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या तिथी तारीख, वेळ.
दरम्यान डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेच्या चंद्राला कोल्ड मून प्रमाणेच लॉंग नाईट्स मून असे देखील संबोधले जाते. 21 डिसेंबरला दक्षिणायनानंतर रात्र मोठी होत जाते त्यामुळे या डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला लॉंग नाईट मून नाव पडलं आहे.