Axiom Mission 4 आज अवकाशात झेपावणार; शुभांशू शुक्ला नवा इतिहास रचण्यास सज्ज

भारत, हंगेरी आणि पोलंडसाठी, हे अभियान दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर मानवी अंतराळ उड्डाणात परत येण्याचे प्रतीक आहे.

Axiom Mission 4 आज अवकाशात झेपावणार;  शुभांशू शुक्ला नवा इतिहास रचण्यास सज्ज
Axiom-4 |Axiom Mission 4, ISRO (Photo Credits: Axiom Space Official website, X/@isro)

Axiom Mission 4 (Ax-4) या का खाजगी स्पेसफ्लाईट च्या माध्यामातून अंतराळवीर International Space Station (ISS) मध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत.  स्पेसफ्लाईट अमेरिकेच्या  फ्लोरिडाच्या  Kennedy Space Center मधून उड्डाण घेणार आहे. Axiom Space, हे  NASA आणि SpaceX चं एकत्र मिशन आहे. यामध्ये जगातील विविध अंतराळवीरांचा समावेश आहे. आज दुपारी 2.31 EDT म्हणजेच भारतीय वेळेनुसार, दुपारी 12.01 वाजता च्या   सुमारास स्पेसफ्लाईट अंतराळात प्रक्षेपित होणार आहे. यामध्ये 4 अंतराळवीर प्रवास करणार आहेत.  

Axiom Mission 4 मध्ये कोणा-कोणाचा समावेश?    

Axiom Mission 4 या मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे, जो ISRO चे प्रतिनिधित्व करत आहे. तो या मोहिमेचा पायलट म्हणून काम पाहणार आहे. त्यांच्यासोबत नासाचे अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन (Peggy Whitson), पोलंडचे ईएसए अंतराळवीर स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की (Sławosz Uznanski-Wisniewski) आणि हंगेरीचे टिबोर कापू (Tibor Kapu) हे आहेत. भारत, हंगेरी आणि पोलंडसाठी, हे अभियान दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर मानवी अंतराळ उड्डाणात परत येण्याचे प्रतीक आहे. 

Axiom Space चं Ax-4 mission

बुधवारी होणाऱ्या प्रक्षेपणापूर्वी Axiom-4 ला अनेक वेळा विलंब झाला आहे. सुरुवातीला प्रतिकूल हवामानामुळे काही तांत्रिक समस्या उद्भवल्या होत्या, त्यानंतर Falcon 9 rocket मध्ये आढळलेल्या गळतीसह काही तांत्रिक समस्या उद्भवल्या. संपूर्ण आढावा आणि समस्या दूर केल्यानंतर, प्रक्षेपण मंजूर करण्यात आले. Axiom Spaceच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत आयएसएसवरील हे चौथे खाजगी अंतराळवीर मोहीम आहे, जे व्यावसायिक अंतराळ मोहिमा आणि भागीदारींमध्ये वाढत्या आंतरराष्ट्रीय रसाचे संकेत देते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).