अपोलो 11 अंतराळ मोहिम: NASA ची पहिली चंद्रमोहिम आणि Apollo 11 यानाबद्दल जाणून घ्या '8' महत्त्वाच्या गोष्टी

या नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये 3 अंतराळवीरांचा समावेश आहे. 16 जुलै 1969 दिवशी केनेडी स्पेस सेंटर लाँच कॉम्प्लेक्स 39 (Kennedy Space Center Launch Complex 39) येथून उड्डान घेतलेले यान चंद्राच्या दिशेने झेपावलं.

First Moon Landing Mission (Photo Credits: Wikimedia Commons)

Moon Landing 50th Anniversary: अपोलो 11 अंतराळ मोहिमेला (Apollo 11 Space Mission) आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये 3 अंतराळवीरांचा समावेश आहे. 16 जुलै 1969 दिवशी केनेडी स्पेस सेंटर लाँच  कॉम्प्लेक्स 39 (Kennedy Space Center Launch Complex 39) येथून उड्डान घेतलेले यान चंद्राच्या दिशेने झेपावलं. अपोलो 11 हे नासाच्या अपोलो अभियानातील 5 वं मानवी मिशन आणि तिसरी चंद्र मोहिम (Moon Mission) आहे. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवणं ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट अस्तित्त्वामध्ये आली आणि केवळ अमेरिका नव्हे तर सार्‍या जगाच्या दुष्टीने हा दिवस विशेष ठरला. मग अंतराळ विश्वातील या पहिल्या अतुलनीय कामगिरीबद्दल जाणून घ्या काही खास गोष्ट.  अपोलो 11 अंतराळ मोहिम: मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याला 50 वर्षे पूर्ण, गुगल ने बनवले खास डूडल

अपोलो 11 अंतराळ मोहिम

1. अपोलो 11 अंतराळ मोहिमेमध्ये Neil Armstrong,Edwin Aldrin, आणि Mike Collins यांचा समावेश होता. या मिशनपूर्वी 6 महिने म्हणजे जानेवारी 1969 मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती.

2. 16 जुलै 1969, दिवशी 9:31am वाजता अपोलो 11 हे केनेडी स्पेस सेंटर मधून अवकाशामध्ये उडाले. तर 20 जुलै दिवशी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले.

3. सुमारे 240,000 माईल्सचा प्रवास 76 तास केल्यानंतर Apollo 11 हे यान 19 जुलै दिवशी चंद्राच्या कक्षेमध्ये गेले होते.

4. चंद्राजवळ यान पोहचल्यानंतर चंद्रयान इगल हे वेगळं झालं. त्यावेळेस चंद्रयान इगल हे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन एल्ड्रिन यांनी रात्री 1 वाजून 47 मिनिटांनी चंद्राच्या शांती सागर मैदानावर लॅन्डिंग केलं. तर परिक्रमा यान कोलंबिया चंद्राजवळ परिक्रमा करत होते. यावेळेस कोलंबिया यान मायकल कॅलिस यांच्या नियंत्रणामध्ये होते.

5. चंद्राच्या शांतीसागर मैदानावर ईगल यान आल्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग शिडीच्या मदतीने चंद्रावर उतरले. त्यांच्या पाठोपाठ एडविन एल्ड्रिन उतरले. सुमारे 3 ते साडे तीन तास चंद्रावर तेथील वातावरण, माती अन्य घटकांची चाचपणी केली. पृथ्वीवरील वाळवंटाप्रमाणे तेथे माती आणि दगड होते.

6. एडविन एल्ड्रिन यांना चंद्राचं रूप खूपच लोभस वाटले. जांभळ्या रंगाच्या मातीवर सूर्याची किरणं पडल्यानंतर तेथील नजारा अधिकच आकर्षक दिसत होता. त्यांनी तेथील माती, दगड उचलून आणले. त्यानंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्याच्यावर अभ्यास केला.

7. तिन्ही अंतराळवीरांचा चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज रोवला आणि काही पावलांची धाव घेतली.

via GIPHY

8. 22 जुलै दिवशी या यानाने पृथ्वीकडे जाण्याचा परतीचा प्रवास सुरू केला.

चंद्रावर शेवटचं लॅन्डिंग करणार्‍यांमध्ये अंतराळवीर Eugene Cernan (1934) आणि Harrison Schmitt (1935) यांचा समावेश आहे. नासा आता 2024 साली Artemis program द्वारा नवी चंद्रमोहिम आखत आहेत. 25 ऑगस्ट 2012 साली नील आर्म स्ट्रॉंग यांचे निधन झाले.