Alien News: समुद्राच्या तळाशी राहतात एलियन्स, मानवापेक्षाही आहेत आधुनिक, UFO अभ्यासकाचा दावा
अगदी आपण चंद्र, मंगळ आणि आंतराळातील विविध ग्रहांवर जरी जाऊन आलो तरी, अद्यापही कोणाला हा पत्ता लागला नाही की, या सृष्टीत अथवा सृष्टीबाहेर एलीयन्स (Alien News) आहेत किंवा नाहीत. एका UFO एक्सपर्टने दावा केला आहे की, होय, खरोखरच एलियन्स (Alien) आहेत.
विज्ञानयुगात आपण कितीही प्रगती केली. अगदी आपण चंद्र, मंगळ आणि आंतराळातील विविध ग्रहांवर जरी जाऊन आलो तरी, अद्यापही कोणाला हा पत्ता लागला नाही की, या सृष्टीत अथवा सृष्टीबाहेर एलीयन्स (Alien News) आहेत किंवा नाहीत. एका UFO एक्सपर्टने दावा केला आहे की, होय, खरोखरच एलियन्स (Alien) आहेत. ते अनेकदा पृथ्वीवर येतात. ते पृथ्वीला वाचविण्यासाठी काम करतात. पृथ्वीवर त्यांचा निवास नेहमीच आढळून आला आहे. मात्र, ते कायमस्वरुपी म्हणाल तर समुद्राच्या (Ocean) तळाशी राहतात.
यूएफओ एक्सपर्टच्या हवाल्याने Daily Star ने एक वृत्त प्रकाशीत केले आहे. या वृत्तानुसार एलियन्स हे नेहमी समुद्रात राहतात. पृथ्वीची मदत करण्यासाठी ते बाहेर येतात. शार्ली राईट हे एक प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे सहकारी राहिले आहेत. त्यांनी 1947 मध्ये रोसवेल क्रॅशमद्ये मारल्या गेलेल्या एलियन्सची मुलाखत घेतल्याचा दावा केला होता. शर्ली राईट यांचा दावा होता की, मुलाखतीदरम्यान विविध प्रश्नांची उत्तरे दिलीच होती. त्याला विचारण्यात आले होते की, समुद्रात किती अंतरापर्यंत तुम्हाला मनुष्यप्राणी आढळून आला. त्यांनी ही घटना एका डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सादर केली आहे. (हेही वाचा, Body Transformation: ही कसली फॅंटसी? बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करुन झाला 'Black alien'; संपूर्ण अंगावर गोंदवले टॅटू (पाहा फोटो))
एलियन्सच्या कथा नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. जगभरातील अनेक ठिकाणी एलियन्स असल्याच्या बातम्या येतात. अनेक ठिकाणी तर एलियन्सचे फुटेजही उपलब्द असल्याचा दावा केला जातो. यूएफओ एक्पपर्टने म्हटले आहे की, पृथ्वीवर एलियन्स येत राहतात. एलियन्स खूपच अत्याधुनिक असतात. ते पृथ्वीखाली अंडरग्राऊंड होऊन राहतात. जरी पृथ्वीवर काहीही घडले तरीही त्यांना कोणताच धोका पोहोचत नाही.