Aditya-L1 Mission launch today: आदित्य-L1 मोहिमेचे श्रीहरिकोटा येथून ISRO द्वारे आज प्रक्षेपण, कोठे पाहाल Live Streaming

या मोहिमेचा भाग म्हणून आदित्य-L1 अंतराळयान श्रीहरीकोठा येथून अवकाशात झेपावले.

ISRO | Photo Credit - Twitter)

Aditya L1 launch: चांद्रयान-3 यशस्वीरित्या प्रक्षेपीत केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज (2 सप्टेंबर) आज आपल्या पहिल्या सौर मोहिमेस सुरुवात करत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आदित्य-L1 अंतराळयान श्रीहरीकोठा येथून अवकाशात झेपावले. या मोहिमेद्वारे सूर्याचे दूरस्थ निरीक्षण केले जाईल. तसेच Solar Corona आणि सौर वाऱ्याचेही निरीक्षण केले जाईल. ते करता येईल अशाच पद्धतीने या यानाची रचना करण्यात आली आहे. अभ्यास करण्यात येणारा Sun-Earth Lagrangian point हा पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे.

आदित्य-L1 ही भारतातील पहिली सौर अवकाश वेधशाळा आहे आणि PSLV-C57 द्वारे प्रक्षेपित केली जाईल. सूर्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी ते सात भिन्न पेलोड्स घेऊन जातील. त्यापैकी पेलोड्स चार सूर्याच्या प्रकाशाचे निरीक्षण करतील आणि इतर तीन प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्रांचे इन-सीटू पॅरामीटर्स मोजतील.

व्हिडिओ

 

आदित्य-L1 मिशन प्रक्षेपण वेळ

सौर मोहीम आज म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणे नियोजित आहे. 30 ऑगस्ट रोजी, इस्रोने सांगितले की सूर्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेल्या आदित्य-L1 मिशनने प्रक्षेपण तालीम आणि अंतर्गत तपासणी पूर्ण केली आहे.

ट्विट

ISRO चे Aditya-L1 मिशन LIVE कुठे पहावे: असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर तुम्ही हे याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला दूरदर्शन वाहिनी किंवा इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल. ISRO ने 1 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 मिशनच्या थेट प्रक्षेपणाची लिंक देखील शेअर केली आहे. आदित्य L1 चे प्रक्षेपण आज सकाळी 11:50 वाजता (IST) होत आहे.