Satellite Internet in India: लवकरच Mukesh Ambani भारतात सुरु करणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा; Jio Platforms ला मिळाली भारतीय अंतराळ नियामकाकडून मंजुरी
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, अंतराळ नियामकाने या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रम ऑर्बिट कनेक्ट इंडियाला भारतीय आकाशात उपग्रह चालविण्यास मान्यता दिली आहे. ऑर्बिट कनेक्ट इंडियाला तीन प्रकारच्या मंजुरी देण्यात आल्या आहेत.
Satellite Internet in India: भारत आणि आशियातील एक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी जवळजवळ भारतामधील सॅटेलाइट इंटरनेट (Satellite Internet) रेस जिंकली आहे. जिओ प्लॅटफॉर्म आणि लक्झेंबर्गच्या एसएएस (SES) यांच्यात गिगाबिट फायबर इंटरनेट प्रदान करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या उपग्रहाचे संचालन करण्यासाठी त्यांच्या संयुक्त उपक्रमाला भारतीय अंतराळ नियामकाकडून मान्यता मिळाली आहे. अशाप्रकारे एलोन मस्कच्याही आधी भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी देशात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करू शकतात.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, अंतराळ नियामकाने या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रम ऑर्बिट कनेक्ट इंडियाला भारतीय आकाशात उपग्रह चालविण्यास मान्यता दिली आहे. ऑर्बिट कनेक्ट इंडियाला तीन प्रकारच्या मंजुरी देण्यात आल्या आहेत.
सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रातील पोहोच वाढवण्यासाठी जगातील अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. ॲमेझॉनपासून ते एलोन मस्कच्या स्टारलिंकपर्यंतच्या कंपन्या ही सेवा भारतात सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरने (IN-SPACE) ऑर्बिट कनेक्टला भारतात उपग्रह चालवण्याची परवानगी दिली. परंतु ऑपरेशन सुरू करण्यासाठी, देशाच्या दूरसंचार विभागाकडून पुढील मंजुरी आवश्यक आहे. (हेही वाचा: Phone Number Fee, Penalty for Inactive SIM Card: एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर भरावे लागू शकते शुल्क; TRAI चा नवा प्रस्ताव, जाणून घ्या सविस्तर)
हाय-स्पीड सॅटेलाइट-आधारित इंटरनेट पुरवण्याची आशा असलेल्या इनमरसॅट या आणखी एका कंपनीलाही भारतात उपग्रह चालवण्यास मान्यता मिळाली आहे. एलोन मस्कच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉन डॉट कॉमच्या क्विपर या दोन अन्य कंपन्यांनीदेखील अर्ज केले आहेत. याआधी युटेलसॅटच्या भारती एंटरप्रायझेस-गुंतवणूक केलेल्या कंपनी वनवेबला गेल्या वर्षीच्या अखेरीस सर्व आवश्यक मंजुरी देण्यात आल्या. दरम्यान, कन्सल्टन्सी डेलॉइटच्या मते, भारताच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा बाजारपेठेत पुढील पाच वर्षांत दरवर्षी 36% वाढ होण्याची आणि 2030 पर्यंत ती $1.9 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर, अंतराळ-आधारित इंटरनेटद्वारे जगातील ग्रामीण भाग जोडण्याची शर्यत जोर धरू लागली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)