सॅमसंग कंपनी लवकरच लॉन्च करणार Galaxy A सीरिजमधील स्मार्टफोन, किंमत फक्त 10 हजार रुपयांपासुन सुरु

त्यामुळे येत्या मार्च ते जून दरम्यान 'गॅलेक्सी ए' (Galaxy A) स्मार्टफोन प्रत्येक महिन्यात लॉन्च करणार असल्याची योजना आखत आहे.

Samsung Galaxy A (Photo Credits-Twitter)

सॅमसंग (Samsung) कंपनीने भारतात शाओमी (Xiaomi)आणि अन्य चीनी स्मार्टफोनच्या ब्रँन्ड्ला टक्कर देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे येत्या मार्च ते जून दरम्यान 'गॅलेक्सी ए' (Galaxy A) स्मार्टफोन प्रत्येक महिन्यात लॉन्च करणार असल्याची योजना आखत आहे. तर 'गॅलेक्सी ए' सीरिज मधील स्मार्टफोन हे देशातील 4 अरब डॉलर ब्रँन्ड बनवण्याचे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. याबाबत एका मुख्य अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

नव्याने येणाऱ्या गॅलेक्सी ए स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत असणार आहे. तर सॅमसंग कंपनी मिड रेंज सेगमेंट मधील स्मार्टफोनची जास्त विक्री होण्यासाठी गेली चार वर्षांपासून नव्या स्मार्टफोनच्या सीरिज लॉन्च करत आहेत.(हेही वाचा-20 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार फोल्डेबल Galaxy F स्मार्टफोन)

गॅलेक्सी एम सीरिज मधील नुकतेच दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन व्यतिरिक्त कंपनी अन्य दोन स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करणार आहे. तसेच साऊथ कोरियन (South Korean) टेक कंपनी सॅमसंग (Samsung) येत्या 20 फेब्रुवारी रोजी Unpacked कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. दरम्यान कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यावेळी Galaxy S10, S10 Pluse आणि S10e लॉन्च करण्याची शक्यता आहे. तसेच Galaxy Watch Active आणि Galaxy Buds सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.