Samsung Galaxy S20 FE 5G: सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोन मिळतेय 40 हजारांपर्यंत सूट, पहा याची वैशिष्ट्ये
सॅमसंगने अलीकडेच जाहीर केले आहे की हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर ग्राहकांना 5 हजार रुपयांची सूट नक्कीच मिळेल. या सवलतीची माहिती कंपनीच्या ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून मिळाली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर ही नवीन किंमत देखील अपडेट केली आहे.
सॅमसंगने (Samsung) यावर्षी मार्चमध्ये नवीन 5G स्मार्टफोन, गॅलेक्सी S20 FE 5G लाँच केला. ज्या फोनची किंमत (Price) लॉन्चच्या वेळी 54,999 रुपये होती. आज तोच फोन 40,000 रुपयांपर्यंत सूटवर (Offer) उपलब्ध आहे. एवढ्या कमी किंमतीत तुम्ही हा मस्त फोन तुमच्या घरी आणू शकता. सॅमसंगने अलीकडेच जाहीर केले आहे की हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर ग्राहकांना 5 हजार रुपयांची सूट नक्कीच मिळेल. या सवलतीची माहिती कंपनीच्या ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून मिळाली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर ही नवीन किंमत देखील अपडेट केली आहे. तसेच वेबसाइटवर या फोनसाठी एक्सचेंज ऑफर देखील जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये जर तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा नवीन फोन घेतला तर तुम्हाला 34,559 रुपयांपर्यंत लाभ घेण्याची संधी मिळू शकते.
वेबसाईटवर मूळ सवलत 5 हजाराऐवजी 4 हजार दाखवत आहे. म्हणजेच तुम्हाला Samsung Galaxy S20 FE 5G वर 38,599 रुपयांची सूट मिळू शकते. ज्यामुळे या फोनची किंमत 16,400 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. फोन ट्रिपल-कॅमेरा सेटअप पॅक करतो ज्यात f/1.8 अपर्चरसह 12MP मुख्य कॅमेरा, 30x डिजिटल झूम सपोर्टसह 8MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. व्हिडिओ कॉल करण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. हेही वाचा Reliance Jio च्या 'या' प्लॅन्स सोबत जिओफोन मिळेल मोफत
या फोनमध्ये ग्राहकाला 4,500mAh ची बॅटरी मिळेल जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. ड्युअल-सिम आणि 5G वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 द्वारे समर्थित, हा सॅमसंग स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध असेल. त्याची स्क्रीन 6.5-इंच आहे जी सुपर AMOLED इन्फिनिटी ओ वैशिष्ट्य आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सुसज्ज आहे.
डिव्हाइसमध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधनासाठी IP68 रेट केलेले आहे. हा फोन क्लाउड रेड, क्लाउड नेव्ही, क्लाउड मिंट, क्लाउड लॅव्हेंडर आणि क्लाउड व्हाईट अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या खालच्या बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे आणि सॅमसंगने 3.5 मिमी ऑडिओ सॉकेट सोडला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)