भारतात Samsung Galaxy M21 येत्या 16 मार्चला होणार लॉन्च

सॅमसंग भारतीय बाजारात Galaxy M सीरीज अंतर्गत नवा स्मार्टफोन Galaxy M21 लॉन्च करणार आहे. येत्या 16 मार्चला हा स्मार्टफोन दुपारी 12 वाजता ग्राहकांना अॅमेझॉनच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. अॅमेझॉनवर स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत अधिक माहिती सुद्धा देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M21 (Photo Credits-Twitter)

सॅमसंग भारतीय बाजारात Galaxy M सीरीज अंतर्गत नवा स्मार्टफोन Galaxy M21 लॉन्च करणार आहे. येत्या 16 मार्चला हा स्मार्टफोन दुपारी 12 वाजता ग्राहकांना अॅमेझॉनच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. अॅमेझॉनवर स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत अधिक माहिती सुद्धा देण्यात आली आहे. भारतीय बाजारात 6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच Infinity-U सुपर अॅमेलोड डिस्प्ले सुद्धा देण्यात आला आहे. अॅमेझॉनवर लिस्टिंग झालेल्यानुसार, Samsung Galaxy M21 मध्ये पावर बॅकअपसाठी युजर्सला 6000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येणार आहे. अॅमेझॉनवर स्मार्टफोनचा लूक सुद्धा झळकवण्यात आला आहे. फोनच्या बॅकपॅनलच्या येथे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे.

स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर दिला असून फ्रंट कॅमेरा 20mp चा असणार आहे. या स्मार्टफोनची मुख्य युएसबी 6000mAh बॅटरी असून 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. फोनमध्ये सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येणार आहे. अद्याप फोनच्या प्रोसेसर बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.(Mi Super Sale आजपासून सुरु; Redmi Note 7 Pro, Note 8 Pro यांसारख्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट)

यापूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम21 मॉडेल क्रमांक SM-M215F सह Geekbench वर स्पॉट करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनला Exynos 9611 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात येऊ शकतो. या मध्ये दोन स्टोरेजचे ऑप्शनसह युजर्सला खरेदी करता येणार आहे. फोनच्या एका वेरियंटमध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल मेमोरी देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या वेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 128 GB इंटरनल मेमोरी आहे. त्याचसोबत हा स्मार्टफोन Android 10 OS आधारावर काम करणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now