Samsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सॅमसंग इंडियाने गुरुवारी गॅलेक्सी ए सिरीज रिफ्रेश करत जगातील पहिला रोटेटिंग ट्रिपल कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए80 भारतात लॉन्च केला.

Samsung Galaxy A80 (Photo Credits: Samsung)

सॅमसंग इंडियाने (Samsung India) गॅलेक्सी ए सिरीज (Galaxy A Series) रिफ्रेश करत जगातील पहिला रोटेटिंग ट्रिपल कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए80 (Galaxy A80) भारतात लॉन्च केला. याची किंमत बाजारात 47,990 रुपये आहे. गॅलेक्सी ए80 मध्ये 3,700 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सॅमसंग पे सह यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730जी ओक्टा-कोर चिपसेट देखील देण्यात आले आहे.

सॅमसंग इंडिया मोबाईल बिजनेसचे डिरेक्टर आदित्य बब्बर यांनी सांगितले की, "गॅलेक्सी ए80 मध्ये 48 मेगापिक्सल असलेला जगातील पहिला ट्रिपल कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यातून काढलेल्या फोटोजची क्वालिटी अतिशय उत्तम असते. तसंच यात दोन्ही फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यातून व्हिडिओ शूट करता येईल." (जबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये)

गॅलेक्सी ए80 चा सेल्फी मोड कॅमेरा अॅप असलेला हा स्मार्टफोन तीन कॅमेरा पॉपअप आणि रोटेट सह येतो. कॅमेऱ्यातून सुपर स्टेडी मोड अल्ट्रा व्हाईट व्हिडिओ शूट केले जाईल आणि यात 3 डी डेप्थ कॅमेरा व्हिडिओ लाईव्ह फोकस प्रदान करेल.

पहा व्हिडिओ:

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने नवा 6.7 इंचाचा एफएचडी प्लस सुपर एमोलेड 'इनफिनिटी डिस्प्ले' दिला आहे. याशिवाय यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड मेमरी दिली आहे. हा अॅनरॉईड पाय ओएस सह सॅमसंगच्या युआय इंटरफेस वर चालतो.

बॅटरी 25 डब्ल्यू सुपर फास्ट चार्जर टेक्नॉलॉजी सह युएसबी टाईप सी च्या गॅलेक्सी ए80 मध्ये आहे. 1 ऑगस्टपासून गॅलेक्सी ए80 रिटेल स्टोअर, ई-दुकानं, सॅमसंग ऑपेरा हाऊस आणि सर्व प्रमुख ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन व्हाईट, फेंटम ब्लॅक आणि एंजिल गोल्ड या रंगात उपलब्ध असेल.



संबंधित बातम्या