Apple Watch Series 7: अॅपल वॉच सिरीज 7 चा सेल उद्यापासून सुरु; जाणून घ्या खास ऑफर्स

सेल सुरु होण्यापूर्वी अँपलने कॅशबॅक आणि ईएमआय पर्यायांची घोषणा केली आहे.

Apple Watch Series 7 (Photo Credits: Apple)

अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) चा सेल उद्या (शुक्रवार, 15 ऑक्टोबर) पासून भारतात सुरु होणार आहे. सेल सुरु होण्यापूर्वी अॅपलने कॅशबॅक (Cashback) आणि ईएमआय (EMI) पर्यायांची घोषणा केली आहे. अॅपल वॉच खरेदी करताना एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करून 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा (No-cost EMI) पर्याय निवडू शकतात.

अॅपल वॉच सिरीज 7 च्या 41 मिमी व्हेरियंटची किंमत 41,900 रुपये आहे परंतु कॅशबॅकचा लाभ घेऊन तुम्ही हे डिव्हाईस फक्त 38,900 रुपयांना विकत घेऊ शकता. तसेच सिरीज 7 च्या 45 मिमी व्हेरिएटची किंमत 44,900 रुपये आहे. पण कॅशबॅकनंतर 41,900 रुपयांना खरेदी करता येईल. अॅपल वॉच सिरीज 7 मध्ये मध्ये हिरवा, लाल, निळा आणि स्टारलाईट हे रंग उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, स्टेनलेस स्टीलचे मॉडेल सिल्वर, ग्रेफाइट आणि गोल्ड स्टेनलेस स्टीलमध्ये उपलब्ध असतील. (Apple Watch Series 7 च्या प्री-बुकिंगला सुरुवात)

अॅपल वॉच सिरीज 7 मध्ये रि-इंजिनिअरिंग केलेला ऑलवेज-ऑन रेटिना डिस्प्ले आहे ज्यात मोठी स्क्रीन आणि स्लिम बॉर्डर आहे. नवीन माइंडफुलनेस अॅप, स्लीप रेस्पिरेटरी रेट ट्रॅकिंग आणि Tai Chi आणि Pilates वर्कआउटचा सपोर्टसुद्धा आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करू होईल.

या वॉचमध्ये इलेक्ट्रिकल हार्ट सेन्सर, ईसीजी अॅप आणि ब्लड ऑक्सिजन सेन्सर दिला आहे. IP6X certification असेलेले हे अँपलचे पहिले स्मार्टवॉच आहे. तसेच या वॉचला WR50 water resistance रेटिंग मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या स्मार्टवॉचला 18 तासांची बॅटरी लाईफ आहे. अॅपल वॉच सिरीज 6 पेक्षा या वॉचला 33% फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. तसेच या वॉचमध्ये मोठी फॉन्ट साईझ आणि नवीन QWERTY कीबोर्ड सुद्धा देण्यात आला आहे.