PUBG खेळण्यासाठी तुमच्या Smart Phones मध्ये हवे 'हे' खास फीचर्स

तसेच 2018, मार्चमध्ये लॉन्च केलेल्या या गेमचे आतापर्यंत 10 करोड युजर्स झाले आहे.

PBUG Game (फोटो सौजन्य- फेसबुक)

सध्या गेमिंगच्या दुनियेत पबजी (PUBG) हा सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळला जात आहे. तसेच 2018, मार्चमध्ये लॉन्च केलेल्या या गेमचे आतापर्यंत 10 करोड युजर्स झाले आहे. या गेमचे चार सीजन आले असून नवीन सीजन गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला आहे.

पबजीचा नवा सीजन गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला आहे. तर  युजर्संना हा गेम मोबाईलमध्ये खेळण्यास फार आवडतो. मात्र काही युजर्समध्ये या पबजी गेमबद्दल संभ्रम दिसून येत आहे. त्यासाठी मोबाईलमध्ये किती Specification असायला हवे हे माहितीच नसते.

तर पबजी खेळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये 'हे' फिचर्स असणे जरुरीचे

- पबजी गेम खेळण्यासाठी तुमच्या Android मोबाईलचे 5.1.1 किंवा त्याच्या पुढील Version असणे आवश्यक आहे.

-तर मोबाईमध्ये कमीत कमी 2GB Ram असणे गरजे असून iOS असलेल्या मोबाईलमध्ये खेळता येऊ शकतो.

- iOS9 च्या पुढील Version असलेल्या स्मार्टफोनमध्ये पबजी सहजपणे खेळता येऊ शकणार आहे.

- तसेच Apple कंपनीच्या iPhone5s आणि त्याच्या नंतरच्या आयफोन सीरिजच्या मोबाईलमध्ये हा गेम उपलब्ध आहे.

- पबजी हा गेम HD मध्ये खेळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये 4GB Ram असणे गरजेचे आहे.