लवकरच Reliance Jio बाजारात घेऊन येणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; किंमत फक्त 2500 ते 3000 रुपये
4G नंतर, आता जिओ 2G कनेक्शन वापरणार्या 20 ते 30 कोटी वापरकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणखी एक मोठा धमाका करण्याची योजना आखत आहे. 4G नंतर, आता जिओ 2G कनेक्शन वापरणार्या 20 ते 30 कोटी वापरकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन (5G Smartphone) बाजारात आणण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या वतीने असे सांगितले गेले आहे की, बाजारातील या फोनची मागणी लक्षात घेता कंपनी या स्मार्टफोनची किंमत 2,500 ते 3,000 पर्यंत करू शकते.
यासंदर्भात रिलायन्स जिओला पाठविलेल्या ईमेलला सध्या कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या 5G स्मार्टफोनची किंमत 27,000 रुपयांपासून सुरू होते. जिओ ही पहिली कंपनी आहे जी भारतातील ग्राहकांना विनामूल्य 4G मोबाइल फोन देते. त्याअंतर्गत जिओ फोनसाठी 1,500 रुपयांचे पेमेंट करावे लागले जे तुम्हाला परत दिले जाते. कंपनीच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त करण्याबाबत भाष्य केले होते. या व्यतिरिक्त, सध्या 2G वापरणाऱ्या 35 कोटी भारतीयांना नवीन नेटवर्कवर शिफ्ट करण्याचे विचार बोलून दाखवले होते. (हेही वाचा: Paytm Credit Card: पेटीएम लवकरच सादर करेल आपले क्रेडिट कार्ड; जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा आणि ऑफर्स बद्दल)
भारत 5G च्या उंबरठ्यावर उभा असताना हे घडले होते. कंपनी आपल्या 5G नेटवर्क उपकरणांवर देखील काम करत आहे आणि त्यांनी दूरसंचार मंत्रालयाला या उत्पादनांच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यास सांगितले आहे. असा विश्वास आहे की रिलायन्सच्या स्वस्त 5G स्मार्टफोनसाठी ऑपरेटिंग सिस्टम बनविण्यात मायक्रोसॉफ्टची मदत घेतली जाऊ शकते. देशात अद्याप 5 जी नेटवर्क सुरू झाले नाही आणि यासाठी कंपनीने सरकारकडे परवानगी मागितली आहे.