Reliance Jio ने हटवला 49 रुपयांचा प्लॅन आता ₹75 पासून रिजार्च उपलब्ध
मात्र जिओच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली नाही आहे. त्यामुळे प्लॅनच्या किंमती वाढवण्यापेक्षा सर्वात स्वत असा 49 रुपयांच्या प्लॅन हटवला असून त्याची सुरुवाती किंमत 75 रुपये ठेवण्यात आली आहे.
रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये काही दिवसांपूर्वी बदल केला आहे. मात्र जिओच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली नाही आहे. त्यामुळे प्लॅनच्या किंमती वाढवण्यापेक्षा सर्वात स्वत असा 49 रुपयांच्या प्लॅन हटवला असून त्याची सुरुवाती किंमत 75 रुपये ठेवण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वीच जिओने त्यांच्या युजर्ससाठी ऑल-इन-वन प्लॅन उपलब्ध करुन दिला होता. तर 75 रुपयांचा प्लॅन हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. टेलिकॉमटॉक यांच्या रिपोर्टनुसार, 75 रुपयांच्या प्लॅनसह 99 रुपये, 153, 297 आणि 594 रुपयांसह दुसरे प्लॅन ही उपलब्ध आहेत. त्याचसोबत युजर्सला नॉन-जिओसाठी अतिरिक्त IUC टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे.
तर जिओ युजर्सला 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री अनलिमिट कॉलिंग करण्याची सुविधा देण्यात आली होती. तसेच 28 दिवसांचा हा प्लॅन होता. आता 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड जिओ-टू-जिओ कॉलिंग, 500 मिनिटे नॉन-जिओ कॉल्स आणि दररोज 100mb डेटासह 50 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची सुद्धा वॅलिडिटी 28 दिवस आहे.(Reliance Jio युजर्सला मोठा दिलासा, पुन्हा आले 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन)