खुशखबर! Reliance Jio ने जुन्या प्लान्समध्ये दिला दुप्पट डेटा, जिओ ची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर

या ऑफरमध्ये ग्राहकांना कोणतीही नवीन प्लान्सची ऑफर न देता जुन्या प्लान्समध्ये आहे त्या पेक्षा दुप्पट डेटा देण्याची सुविधा दिली आहे. ही आतापर्यंतची रिलान्स जिओची सर्वात मोठी ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे.

खुशखबर! Reliance Jio ने जुन्या प्लान्समध्ये दिला दुप्पट डेटा, जिओ ची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर
Reliance Jio | (File Photo)

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी अशी बंपर ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना कोणतीही नवीन प्लान्सची ऑफर न देता जुन्या प्लान्समध्ये आहे त्या पेक्षा दुप्पट डेटा देण्याची सुविधा दिली आहे. ही आतापर्यंतची रिलान्स जिओची सर्वात मोठी ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओ ने या ऑफरमध्ये 11,21, 51,101 आणि 251 रुपयांच्या प्लान्समध्ये डेटा वाउचर देत आहे. तसेच 251 रुपयांचा प्लान सोडून अन्य सर्व प्लान्समध्ये Non-Jio FUP मिनिट सुद्धा उपलब्ध केले आहेत. तसेच सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट डेटा उपलब्ध करुन दिला आहे.

या ऑफरमध्ये कोणताही नवीन प्लान देण्यात आलेला नाही. तर आधीच्या जुन्या प्लानमध्ये डबल डेटा ची सुविधा देण्यात आली आहे. Reliance Jio चे सर्वात बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज युजर्सला मिळणार 2GB डेटा

याआधी 11 रुपयांच्या प्लानमध्ये 400GB डेटा दिला जात होता तो आता 800GB करण्यात आला आहे. त्याशिवाय 75 नॉन-जिओ FUP मिनिटही देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे अन्य 21 रुपयांच्या प्लानमध्ये 2GB, 51 रुपयांच्या प्लानमध्ये 6GB, 101 रुपयांच्या प्लानमध्ये 12GB डेटा देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे 21 रुपयांच्या प्लानमध्ये 200 Non-Jio FUP, 51 रुपयांच्या प्लानमध्ये 500 Non-Jio FUP, 101 रुपयांच्या प्लानमध्ये 1000 Non-Jio FUP मिनिट देण्यात आले आहेत.

251 रुपयांच्या प्लानमध्ये कोणेतही बदल करण्यात आले नसून या प्लानची वैधता 51 दिवसांचीच कायम ठेवण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2020 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).