Reliance Jio Bharat GPT: रिलायन्स जिओ घेऊन येत आहे 'भारत जीपीटी', ChatGPT शी करेल स्पर्धा, Akash Ambani ची घोषणा

दूरसंचार व्यतिरिक्त, कंपनीला या क्षेत्रात प्रगती करायची आहे आणि मीडिया, कॉमर्स, डिव्हाइस आणि कम्युनिकेशन क्षेत्रात आपल्या सेवांचा आणखी विस्तार करायचा आहे.

Reliance Jio (Photo Credit: Facebook)

आजच्या युगात एआय टूल्सची (AI Tools) क्रेझ आणि वापर वाढू लागला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वाढती लोकप्रियता पाहता रिलायन्सनेही मोठी तयारी केली आहे. रिलायन्स जिओनेदेखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ChatGPT सारख्या एआय साधनांशी स्पर्धा करण्यासाठी, रिलायन्स जिओने Bharat GPT लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक टेकफेस्टमध्ये सांगितले की, कंपनी आयआयटी बॉम्बे सोबत एआय चॅटबॉटवर काम करत आहे, जे चॅट जीपीटी प्रमाणे काम करेल.

त्यांनी सांगितले की कंपनी 2014 पासून भारत जीपीटीवर काम करत आहे आणि सर्व भाषा मॉडेल्सपासून प्रेरणा घेऊन ते तयार केले जात आहे. मात्र,  हा चॅटबॉट कधी लाँच होणार याबाबत त्यांनी माहिती देण्यात आली नाही. आकाश अंबानी यांनी कंपनीचे 'Jio 2.0' व्हिजन साकार करण्यावर आणि एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे, जेणेकरुन नवीन परिसंस्था निर्माण करता येईल.

वार्षिक टेकफेस्टमध्ये आकाश अंबानी म्हणाले की, भारत जीपीटी व्यतिरिक्त कंपनी टीव्हीसाठी स्वतःच्या ओएसवर काम करत आहे. दूरसंचार व्यतिरिक्त, कंपनीला या क्षेत्रात प्रगती करायची आहे आणि मीडिया, कॉमर्स, डिव्हाइस आणि कम्युनिकेशन क्षेत्रात आपल्या सेवांचा आणखी विस्तार करायचा आहे. आकाश अंबानी यांनी या कार्यक्रमात कंपनीच्या 5G रोलआउटबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की कंपनी प्रत्येक आकाराच्या संस्थांना 5G नेटवर्क प्रदान करेल. (हेही वाचा: Tesla Robot Attacks Engineer: टेस्ला रोबोटचा सॉफ्टवेअर अभियंत्यावर हल्ला- वृत्त)

दरम्यान, रिलायन्स जिओने काही काळापूर्वी 'हॅपी न्यू इयर प्लॅन' लॉन्च केला आहे. या प्लॅनचा रोजचा खर्च फक्त 8.21 रुपये आहे. हॅपी न्यू इयर 2024 प्रीपेड प्लॅन अंतर्गत, कंपनी 24 दिवसांची वेगळी वैधता देत आहे. म्हणजेच तुम्हाला 365+24 दिवसांचा लाभ मिळेल. या प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना 365 दिवसांसाठी 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. जिओच्या इतर प्लॅनप्रमाणे, ज्या लोकांनी जिओ वेलकम ऑफरचा लाभ घेतला आहे त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेट मिळेल.