Reliance Jio युजर्सला मोठा दिलासा, पुन्हा आले 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन

तर एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी अन्य नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिल्यानंतर आता जिओने ही त्यांचे 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन पुन्हा आणले आहेत.

Reliance Jio | (File Image)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) पुन्हा एकदा ग्राहांना दिलासा दिला आहे. तर एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी अन्य नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिल्यानंतर आता जिओने ही त्यांचे 149 आणि 98 रुपयांचे प्लॅन पुन्हा आणले आहेत. कंपनीकडूनन टॅरिफचे दर वाढवल्यानंतर डेटा सुद्धा महाग झाले होते. त्याचसोबत फ्री अनलिमिटेड कॉलिंगवर FUP लिमिट लावल्याने युजर्समध्ये निराशा दिसून आली. यामुळेच कंपनीने त्यांच्या प्लॅनध्ये बदल करत आहे.

तर टॅरिफ दर वाढवल्यानंतर जिओने युजर्सला 1 जीबी डेटा मिळणारे प्लॅन बंद केले. यामुळे बहुतांश युजर्सला कंपनीचा हा निर्णय पटला नागी. मात्र आता कंपनीने युजर्सची गरज लक्षात घेता पुन्हा एकदा 149 रुपयांचा प्लॅन सुरु केला आहे. यामध्ये 24 जीबी डेटासह 24 दिवसांची वॅलिटीडी असणार आहे. तसेच 100 फ्री एसएमएस आणि जिओ-टू-जिओ फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी यामध्ये 300 एफयुपी मिनिट्स मिळणार आहेत. याचसोबत रिलयान्सच्या जिओ अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.(Idea- Vodaphone ग्राहकांसाठी खुशखबर; आता दुसऱ्या नेटवर्कवरही मिळणार Unlimited फ्री कॉलिंग)

 तर 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिडिटी आणि दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी जे जास्त कॉलिंग करत नाहीत. प्लॅनमध्ये जिओ-टू- जिओ कॉलिंग फ्री आहे. तसेच जिओच्या नेटवर्क बाहेर कॉल करण्यासाठी युजर्सला आययुसी वेगळा प्लॅन रिजार्च करावा. आययुसीचा प्लॅन 10 रुपयांपासून सुरु असून यामध्ये दररोज ग्राहकाला 100 एसएमएस मिळणार आहेत.