खुशखबर! Reliance Jio च्या नव्या 249 रुपयांच्या प्लानमध्ये मिळतोय दरदिवसा 2GB डेटा, वाचा सविस्तर
नुकत्याच या कंपनीने एका नवीन प्रिपेड प्लानची घोषणा केली आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 249 रुपयांत दर दिवसा 2GB डेटा मिळणार आहे.
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) जास्तीत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन प्लान्स आणत असते. नुकत्याच या कंपनीने एका नवीन प्रिपेड प्लानची घोषणा केली आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 249 रुपयांत दर दिवसा 2GB डेटा मिळणार आहे. या प्रिपेड प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. 250 रुपयांपेक्षाही कमी असलेल्या या प्लानमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएसमध्येही विशेष सूट देण्यात आली आहे.
रिलायन्स जिओच्या 249 रुपयांच्या या प्लानमध्ये दर दिवसा 2GB डेटा प्रमाणे 56GB डेटा मिळणार आहे. त्याचबरोबर यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवसा 100 मोफत एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना या प्लानमध्ये JioTV, JioCinema आणि JioSecurity यासारखे अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.(Work From Home Postpaid Plan: घरातून काम करण्यासाठी सर्वोत्तम 4G पोस्टपेड प्लान; जाणून घ्या जिओ, एअरटेल आणि Vi चा 'वर्क फ्रॉम होम पोस्टपेड प्लान')
दरम्यान कंपनीने सध्याचा लॉकडाऊन आणि लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता 300 मिनिटे विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर, जिओ आपल्या ग्राहकांना एका रिचार्जवर दुसरा रिचार्ज फ्री देत आहे. या ऑफरचा फायदा फक्त जिओ फोन (Jio Phone) वापरकर्त्यांनाच मिळेल. जे लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या फोनचा रिचार्ज करू शकत नाहीत अशा लोकांना या ऑफरचा फायदा होणार आहे. आपल्या ग्राहकांना नवीन ऑफर देण्यासाठी जिओने रिलायन्स फाऊंडेशनबरोबर भागीदारी केली आहे.
कंपनीने ग्राहकांसाठी एकूण दोन सुविधा जाहीर केल्या आहेत. पहिल्या ऑफरबाबत बोलायचे झाले तर, जिओफोन ग्राहकांना कोरोना साथीच्या काळात दरमहा 300 विनामूल्य मिनिटे दिली जातील. दररोज 10 मिनिटांप्रमाणे ही 300 मिनिटे ग्राहकांना दिली जातील. या सुविधेचा लाभ अशा ग्राहकांना देण्यात येणार आहे, जे सध्या साथीच्या आजारामुळे त्यांचे जिओ फोन रिचार्ज करण्यास अक्षम आहेत.