Reliance AGM 2024: आता Google Drive, iCloud शी स्पर्धा करण्यासाठी येत आहे Jio AI-Cloud; वापरकर्त्यांना मिळणार 100 जीबी विनामूल्य स्टोरेज, जाणून घ्या सविस्तर
जिओ वापरकर्त्यांना फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज आणि इतर डिजिटल सामग्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्टोरेज सुविधा दिली जाईल. वापरकर्त्यांना 100 GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळेल. मात्र, यापेक्षा जास्त जीबीसाठी पैसे द्यावे लागतील.
Reliance AGM 2024: आज, म्हणजेच 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:00 वाजता सुरू झालेल्या, रिलायन्सच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अनेक विशेष घोषणा केल्या आहेत. यावेळी, ग्राहकांना खूश करण्यासाठी, जिओने 100 GB पर्यंत मोफत स्टोरेज देण्याची घोषणा केली आहे, जी एआय क्लाउड वेलकम ऑफर अंतर्गत दिली जाईल. वार्षिक कार्यक्रमादरम्यान याबाबत घोषणा करताना, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, ते सर्वात वाजवी किंमतीत अधिक स्टोरेज सुविधा प्रदान करतील. कंपनी Jio AI-Cloud स्वागत ऑफर लाँच करण्याच्या तयारीत आहे, जी यावर्षी दिवाळीपूर्वी दिली जाऊ शकते.
याद्वारे जिओ वापरकर्त्यांना फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज आणि इतर डिजिटल सामग्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्टोरेज सुविधा दिली जाईल. वापरकर्त्यांना 100 GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळेल. मात्र, यापेक्षा जास्त जीबीसाठी पैसे द्यावे लागतील.
वापरकर्त्यांसाठी मनोरंजनाचा पिटारा उघडून, मुकेश अंबानी यांनी लाइव्ह टीव्ही आणि ऑन-डिमांड शोसाठी JioTV OS, JioHome आणि JioTV+ ची घोषणा केली आहे. या अंतर्गत यूजर्स 860 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकतील. इतकेच नाही तर, JioTV+ सह वापरकर्त्यांना Amazon Prime Video, Disney Plus आणि Hotstar सारख्या ॲप्समध्येही प्रवेश मिळेल. लवकरच लाँच होणारी JioTV OS ही पूर्णपणे घरगुती ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी विशेषतः सेट-टॉप बॉक्सेस (STBs) साठी डिझाइन केलेली आहे. (हेही वाचा: YouTube Premium Price Hike: भारतामधील ग्राहकांसाठी यूट्यूबचा झटका; प्रीमियम योजनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या नवे दर)
यासह कंपनी लवकरच जिओ ब्रेन (Jio Brain) हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जिओ संपूर्ण एआय कव्हर करणारी टूल्स आणि प्लॅटफॉर्म्सचा एक व्यापक संच विकसित करत आहे, ज्याला 'जिओ ब्रेन' म्हणतात. अंबानी म्हणाले, मला आशा आहे की रिलायन्समधील जिओ ब्रेनमध्ये सुधारणा करून आम्ही एक शक्तिशाली एआय सेवा प्लॅटफॉर्म तयार करू. जिओ ब्रेन हे जनरेटिव्ह एआय मॉडेल आहे, ज्याचे काम जलद निर्णय घेणे आणि ग्राहकांच्या गरजा त्वरित पूर्ण करणे हे आहे. कंपनी आपल्या सर्व उपकंपन्यांमध्ये हे एआय टूल वापरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)