Vintage Motor Registration : व्हिंटेज कारचा वारसा जपण्यासाठी वाहनांची नोंदणी सुरू, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी सांगितले की, व्हिंटेज वाहनांचा (Vintage Cars) वारसा वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी व्हिंटेज मोटार वाहनांची नोंदणी (Vintage Motor Registration) प्रक्रिया सुरू केली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी सांगितले की, व्हिंटेज वाहनांचा (Vintage Cars) वारसा वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी व्हिंटेज मोटार वाहनांची नोंदणी (Vintage Motor Registration) प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्राने म्हटले होते की, व्हिंटेज मोटार वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेचे नियोजन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासंदर्भात प्रस्तावित नियमांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. व्हिंटेज वाहनांचा वारसा जपण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने एमओआरटीएचने (MORTH) भारतातील व्हिंटेज मोटार वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेची औपचारिकता केली आहे, असे गडकरी यांनी ट्वीट करत सांगितले.  सध्या वेगवेगळ्या राज्यात नोंदणी प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी विद्यमान कोणतेही नियम नाहीत. नवीन नियमांमध्ये आधीच नोंदणीकृत वाहनांसाठी जुन्या क्रमांकाची नोंद ठेवणे. व्हीए (VA) सिरीज यासारख्या ठळक वैशिष्ट्यांसह त्रास मुक्त प्रक्रिया प्रदान केली जाईल. यासाठी तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व नियम ठरवले होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 25 नोव्हेंबर 2020 रोजी जीएसआर 734 (ई) प्रकाशित केले होते. त्यात सीएमव्हीआर, 1989 मध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात सूचना सांगितल्या होत्या. मसुद्याच्या नियमांमध्ये व्हिंटेज मोटार वाहनांमध्ये सर्व वाहने म्हणून घोषित केली गेली आहेत. ज्यात दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. त्यांच्या पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून वाहने 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. यामधील सर्व वाहने चांगल्या स्वरूपात आहेत. व्हिंटेज मोटारीतील सर्व पार्ट हे चांगल्या पध्दतीने चालत आहेत.

व्हिंटेज मोटर वाहनाला केवळ प्रदर्शन, तांत्रिक संशोधन किंवा व्हिंटेज कार रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी याचा वापर होईल. देखभाल, प्रदर्शन, व्हिंटेज रॅली आणि अशा प्रदर्शन किंवा कार रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी या मोटारींना परवानगी आहे. भारतातील जुन्या वाहनांचा वारसा जपणे आणि त्याचा प्रसार करणे हे यामागील हेतू असल्याचा सरकारने म्हटले आहे. व्हिंटेज मोटारीच्या नोंदणीसाठी फी 20,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर दुसऱ्या नोंदणीसाठी 5000 रुपये ठेवण्यात आली आहे. या मोटारीसाठी दोन वेळेस नोंदणी करावी लागणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif