Redmi Smart Band भारतामध्ये झालं लॉन्च; किंमत 1,599 रूपये, इथे जाणून घ्या खास फीचर्स

दरम्यान त्याची किंमत Rs 1,599 आहे. भारतामध्ये 9 सप्टेंबर पासून तो उपलब्ध होणार आहे.

Redmi | Photo Credits: Twitter/ RedmiIndia

Xiaomi या लोकप्रिय चायनीज कंपनीने आता मोबाईल पाठोपाठ स्मार्ट बॅन्डची देखील रेंज लॉन्च करण्यात सुरूवात केली आहे. यामध्ये आज (8 सप्टेंबर) रेडमी कडून भारतामध्ये Redmi Smart Band लॉन्च करण्यात आला आहे. दरम्यान त्याची किंमत Rs 1,599 आहे. भारतामध्ये 9 सप्टेंबर पासून तो उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाईन हा बॅन्ड mi.com, Mi Home stores, Amazon India यावर उपलब्ध असेल तसेच ऑफलाईन रिटेल शॉप्समध्येही उपलब्ध असणार आहे. मग आता या स्मार्ट बॅन्ड विकत घेण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल तर जाणून घ्या त्यामध्ये नेमकी फीचर्स काय? रंग कोणते उपलब्ध आहेत? आणि बरंच काही.

Redmi Smart Band ची फीचर्स

Redmi Smart Band स्पेसिफिकेशन

Redmi Smart Band हा काळा, निळा, हिरवा आणि ऑरेंज म्हणजेच नारंगी रंगामध्ये उपलब्ध आहे. दरम्यान चीनमध्ये लॉन्च झालेल्या किंमतीपेक्षा हा थोडा महाग आहे. रेडमीच्या Mi Band 3i च्या तुलनेत हा 300 रूपयांनी महाग आहे. त्याची किंमत 1,299 रूपये आहे.