Redmi Note 9 5G सिरीज 26 नोव्हेंबर रोजी होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

कंपनीने ऑफिशियल Weibo अकाऊंटवर त्याचे पोस्टर रिलीज केले आहे.

Redmi Note 9 5G Series (Photo Credits: Abhishek Yadav Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीचा रेडमी नोट 9 5जी सिरीज स्मार्टफोन्स (Redmi Note 9 5G series) 26 नोव्हेंबर 2020 मध्ये अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. कंपनीने ऑफिशियल Weibo अकाऊंटवर त्याचे पोस्टर रिलीज केले आहे. पर्पल (Purple) आणि अॅक्वा (Aqua) या दोन शेड्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. चीन (China) मध्ये 26 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन सोहळ्यात हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. (Redmi Note 9 5 G व्हेरिएंट 24 नोव्हेंबर ला होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स)

Redmi Note 9 Pro 5G मध्ये 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC चा प्रोसेसर 8GB रॅम सह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यात 108MP चा मेन शूटर देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा स्नॅपर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,820mAh ची बॅटरी 33W च्या फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

Redmi Note 9 5G Series (Photo Credits: Weibo)

Redmi Note 9 5G मध्ये 6.53 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले देण्यात आला असून MediaTek Dimensity 800U हा प्रोसेसर आहे. यात 5,000mAh ची  बॅटरी 22.5W या फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी यात 48MP चा मेन कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट शूटर देण्यात आला आहे. Redmi Note 9 5G हा स्मार्टफोन इतर देशांमध्ये Redmi Note 9T म्हणून दाखल होणार आहे. दरम्यान, Redmi Note 9 5G सिरीजची  किंमत बाबत अद्याप गुप्तता बागळण्यात आली आहे. लॉन्चिंग इव्हेंटमध्ये याचा उलघडा होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif