Redmi Note 9 Pro Max India Sale: आज दुपारी 12 वाजल्यापासून Amazon.in आणि Mi.com वर विक्रीला सुरूवात; इथे पहा धमाकेदार फीचर्स, किंमत

Amazon India आणि Mi.com वर आता ही विक्री आज (10 जून) पासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे

Redmi Note 9 Pro Max (Photo Credits: Xiaomi India)

Xiaomi कंपनीचा Redmi Note 9 Pro Max आता भारतामध्ये विक्रीसाठी सज्ज झाला आहे. Amazon India आणि Mi.com वर आता ही विक्री आज (10 जून) पासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे. मात्र सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकत घोंघावत असल्याने आता या फोनच्या विक्रीमध्ये एक्सचेंज ऑफर बंद करण्यात आली आहे. मात्र एअरटेलने 298, 398 रूपयांचे अनलिमिटेड डाटा पॅक जाहीर केले आहेत. भारतात लाँच झालेल्या Oppo A12 स्मार्टफोनची 'ही' जबरदस्त वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही व्हाल हैराण, 10 जूनपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध.

 

Redmi Note 9 Pro Max चे फीचर्स

Redmi Note 9 Pro Max या फोनमध्ये 6.67-इंच फुल एचडी असेल. IPS display असणार आहे. सोबत octa-core Qualcomm Snapdragon 720G SoC असेल. या फोनमध्ये रॅम 8GB of LPDDR4X असेल. The Redmi Note 9 Pro Max हा फोन 128GB of UFS 2.1 storage पर्यंत असून microSD card च्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. हा फोन निळ्या, पांढर्‍या, काळ्या रंगामध्ये उपलब्ध असेल. 64MP प्रायमरी कॅमेरा असणार्‍या या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाईड अ‍ॅन्गल लेंस, 5 MP  मॅक्रो लेंस आणि 2 MP डेप्थ सेंसर आहे.

व्हिडिओ कॉलसाठी 32 MP स्नॅपर आहे.

Redmi Note 9 Pro Max या फोनमध्ये Bluetooth v5.0 देखील असेल तसेच Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल. 6 जीबी फोन 16,499 रूपयांपासून उपलब्ध असेल. 19,999 मध्ये 128 जीबी फोन मिळेल.