Redmi Note 10S चे फिचर्स आले समोर, Amazon वर झाला लाईव
हा फोन अॅमेजॉनवर उपलब्ध होईल. या महिन्याच्या सुरुवातीला Redmi Note 10S लाँच डेट समोर आली होती. त्यानंतर आता या फोनचे लँडिग पेज लाइव झाले आहे.
शाओमी (Xiaomi) कंपनी आपला एक जबरदस्त स्मार्टफोन लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. Redmi Note 10S हा स्मार्टफोन येत्या 13 मे रोजी भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन लाँचिंग आधीच ऑनलाईन शॉपिंग साईट Amazon India त्याचे लँडिंग पेज लाइव करण्यात आले आहे. येत्या 13 मे ला दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच होईल. हा फोन अॅमेजॉनवर उपलब्ध होईल. या महिन्याच्या सुरुवातीला Redmi Note 10S लाँच डेट समोर आली होती. त्यानंतर आता या फोनचे लँडिग पेज लाइव झाले आहे.
Redmi Note 10S स्मार्टफोनसह कंपनी रेडमीचे एक स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात MediaTek Helio G95 असू शकतो. या फोनमध्ये सुपर अमोल्ड डिस्प्ले मिळेल, जी गोरिल्ला ग्साल प्रोटेक्शनसह मिळू शकते.हेदेखील वाचा- 1 जून पासून Google कडून बंद करण्यात येणार ही फ्री सर्विस, युजर्सला द्यावे लागणार पैसे
या स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. त्याचबरोबर यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देईल. त्याशिवाय या फोनमध्ये डुअल स्टीरियो स्पीकर और Hi-Res ऑडियो सर्टिफिकेशन येईल. यात IP53 रेटेड प्रोटेक्शन मिळू शकते. Redmi Note 10S स्मार्टफोन 6GB RAM + 64GB, 6GB RAM + 128GB और 8GB RAM + 128GB स्टोरेज मध्ये लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनच्या किंमीतीविषयी आणि अन्य वैशिष्ट्यांविषयी अजूनतरी अधिकृत माहिती मिळालेली नाही.