Redmi K20 Pro Temporary Price Cut In India: रेडमी के20 प्रो स्मार्टफोन 4 हजाराने झाला स्वस्त; ऑफर 31 ऑगस्टपर्यंत

भारतात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बऱ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर मोठी सूट देत आहेत.

Redmi K20 Pro (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्मार्टफोन कंपनीला मोठ्या नुकसानाला सामोरे जावा लागले आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बऱ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर मोठी सूट देत आहेत. यातच भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी प्रसिद्धी मिळवणारी रेडमी कंपनीदेखील रेडमी के20 प्रो (Redmi K20 Pro) स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 4 हजाराने कपात केली आहे. ही कपात फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत झाली आहे. पण केवळ 31 ऑगस्टपर्यंतच ही ऑफर असणार आहे.

रेडमी के20 प्रो ची किंमत 26 हजार 999 रुपये इतकी आहे. परंतु, हा स्मार्टफोन 4 हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना 22 हजार 999 मध्ये खरेदी करता येणार नाही. मात्र, या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम व्हेरिअंटच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. अ‍ॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट , एम.आयच्या अधिकृत वेबसाइटवरुन 31 ऑगस्टपर्यंत हा फोन कमी किंमतीत खरेदी करता येईल. हे देखील वाचा- Realme C15 First Online Sale आज दुपारी 12 पासून Flipkart आणि Realme.com वर सुरु; पहा किंमत आणि ऑफर्स

रेडमी के20 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 13 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. कार्बन ब्लॅक, फ्लेम रेड, पर्ल ब्लू आणि ग्लेशियर ब्लू अशा तीन रंगांचे पर्याय या फोनसाठी आहेत. तसेच 4 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.