चीनमध्ये OnePlus 8T ची विक्रमी खरेदी; 1 मिनिटात 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री
या स्मार्टफोनच्या लॉन्चनंतर वनप्लसची पहिली विक्री सुरू होताच चीनमध्ये एका मिनिटातचं 100 दशलक्ष युआन म्हणजेच 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे फोन विकले गेले आहेत. तसेच 10 मिनिटात 200 दशलक्ष युआन म्हणजे 200 कोटींहून अधिक किंमतीचे स्मार्टफोन विकले गेले.
प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus 8T च्या नुकत्याच झालेल्या लॉन्चने विक्रीच्या बाबतीत मोठा विक्रम बनवला आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चनंतर वनप्लसची पहिली विक्री सुरू होताच चीनमध्ये एका मिनिटातचं 100 दशलक्ष युआन म्हणजेच 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे फोन विकले गेले आहेत. तसेच 10 मिनिटात 200 दशलक्ष युआन म्हणजे 200 कोटींहून अधिक किंमतीचे स्मार्टफोन विकले गेले.
सध्या भारतात अॅमेझॉन प्राइमचे सदस्य वनप्लस 8 टी खरेदी करू शकतात. वनप्लस 8 टी च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे. वनप्लस 8 टीची विक्री 24 ऑक्टोबरपासून प्राइम मेंबर वगळता सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. यात ग्राहकांना एचडीएफसी डेबिट कार्डवर 1000 रुपये आणि एचडीएफसी क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकेल. याव्यतिरिक्त, अमेरिकन एक्सप्रेस कार्ड वापरकर्ते यावर 10% कॅशबॅकचा लाभ देखील मिळवू शकतात. (हेही वाचा - Micromax's In Series Specifications: मायक्रोमॅक्स इन सिरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; 2 नोव्हेंबरला होऊ शकतो लाँच)
OnePlus 8T फिचर्स -
वनप्लस 8 टी स्मार्टफोन 6.55 इंच 120 हर्ट्झ Fluid AMOLED डिस्प्ले असणार्या या फोनचा स्क्रीन रेझोल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 एसओसी प्रोसेसरसह सज्ज असलेल्या या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच 48 MP Sony IMX586 सेंसर, 16 एमपी अल्ट्रा वाइड एंगल, 5 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी मोनोक्रोम लेन्स असलेले क्वॉड कॅमेरे आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 4500 mAh बॅटरी आहे. जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्ही वनप्लस 8 टी स्मार्टफोन एक्वामारिन ग्रीन आणि सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करू शकता. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम ऑक्सिजन ओएसवर आधारित आहे. सध्या चीनमध्ये हे फोनची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे.