Realme Watch S आणि Watch S Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
रिअलमी (Realme) कंपनीने त्यांचे बहुप्रतिक्षित Watch S सीरिज अंतर्गत Realme Watch S आणि Watch S Pro लॉन्च केले आहे. बजेट रेंज सेगमेंट मधील हे स्मार्टवॉच काही शानदार फिचर्स लैस आहे.
रिअलमी (Realme) कंपनीने त्यांचे बहुप्रतिक्षित Watch S सीरिज अंतर्गत Realme Watch S आणि Watch S Pro लॉन्च केले आहे. बजेट रेंज सेगमेंट मधील हे स्मार्टवॉच काही शानदार फिचर्स लैस आहे. यामध्ये 1.39 इंचाचा एमोलेड टच स्क्रिन ऑल्वेज ऑन डिस्प्ले दिला आहे. या डिवाइसमध्ये दिलेली बॅटरी ही 14 दिवसांचा बॅकअप देणार आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये 100 हून अधिक स्टायलिश फेस वॉच फेसेस ही मिळणार आहेत. तर जाणून घ्या Realme Watch S Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती.(Redmi 8 स्मार्टफोनला मिळाले MIUI 12 अपडेट, जाणून घ्या खासियत)
Realme Watch S Pro भारतात 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हे डिवाइस सिंगल ब्लॅक डायल मध्ये उपलब्ध असणार आहे. हे स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Flipkart वर खरेदी करता येणार आहे. तर पहिल्यांदाच 29 डिसेंबरला दुपारी 12 वाजता सेल स्मार्टवॉच उपलब्ध असणार आहे. (Realme Sale: जबरदस्त ऑफर! रियलमी कंपनीच्या 'या' स्मार्टफोनवर मिळवा तब्बल 4 हजारांची सूट)
या व्यतिरिक्त कंपनी Realme Watch S भारतात लॉन्च केले आहे. याची किंमत 4999 रुपये आहे. डिवाइस ब्लू, ब्लॅक, ऑरेंज, ग्रीन सिलिकॉन स्ट्रेप कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. येत्या 28 डिसेंबरला दुपारी 12 वाजता यासाठी सेल असणार आहे. युजर्सला स्मार्टवॉच सोबत अॅडिशनल सिलिकॉन स्ट्रेप्स ही खरेदी करता येणार आहे. परंतु त्यासाठी 499 रुपये द्यावे लागणार आहेत. तर लेदर स्ट्रेप 999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)