Realme Narzo 30 5G, Narzo 30, Buds Q2 आणि 32-Inch Smart TV च्या भारतातील लॉन्चिंगला सुरुवात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

रियलमी आज भारतात नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहे. चायनीज ब्रँड आज नार्झो 30 सिरीजमधील नवीन रियलमी नार्झो 30 5जी, बडर्स Q2 आणि 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च करत आहे.

Realme Narzo 30 Series & Smart TV (Photo Credits: Realme)

रियलमी (Realme) आज भारतात  नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहे. चायनीज ब्रँड आज नार्झो 30 (Narzo 30) सिरीजमधील नवीन रियलमी नार्झो 30 5जी (Narzo 30 5G), बडर्स Q2 (Buds Q2) आणि 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही (32-Inch Smart TV) लॉन्च करत आहे. आज दुपारी 12.30 पासून हा लॉन्चिंग सोहळा सुरु झाला. युट्युब चॅनलवर तुम्ही हा लॉन्चिंग सोहळा पाहू शकता. (Realme Narzo 30 ची काय असेल खासियत आणि किंमत; जाणून घ्या)

रियलमी नार्झो 30 च्या 6जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत मलेशियात MYR 799 म्हणजेच सुमारे 14,200 इतकी होती. Realme Narzo 30 5G युरोपमध्ये लॉन्च झाला असून त्याची किंमत EUR 219 म्हणजेच 19,400 रुपये इतकी आहे. 4जीबी+128जीबी मॉडलची ही किंमत आहे. कंपनी कदाचित 4GB +128GB वेरिएंट भारतात लॉन्च करणार नाही. त्याऐवजी 6जीबी+128जीबी वेरिएंट लॉन्च केले जाईल.

Realme Narzo 30 5G (Photo Credits: Realme)

Realme India Tweet:

Realme Buds Q2 हे इयरबर्ड्स पाकिस्तानमध्ये 2800 रुपयांना लॉन्च झाले होते. रियलमी नार्झो 30, रियलमी नार्झो 30 5 जी आणि रियमली बर्ड्स क्यू2 यांची भारतातील किंमत ही आंतरराष्ट्रीय मार्केटनुसारच असेल, असा अंदाज आहे. रियलमी नार्झो 30 4 जी मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले, MediaTek Helio G95 प्रोसेसर, 6जीबी रॅम देण्यात आला आहे. यासोबतच 48 एमपी ट्रिपल रियल कॅमेरा, 16 एमपी चा सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर,  5,000mAh ची बॅटरी आणि 30 W डार्ट चार्जर देण्यात आला आहे.

Realme Buds Q2 (Photo Credits: Realme)

Realme Narzo 30 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह 6 जीबी +128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून 2MP चा डेप्थ सेन्सर दिला आहे. या मोबाईलमध्ये सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसंच 18W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही मोबाईल अॅनरॉईड 11 वर आधारित रियलमी UI 2.0 वर काम करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now