Realme Narzo 10A Online Sale Today: आज दुपारी 12 पासून Flipkart आणि Realme.com वर सुरु होणार सेल; पाहा काय आहेत फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि ऑफर्स
Realme Narzo 10A Smartphone (Photo Credits: Realme India)

रियलमी स्मार्टफोन कंपनीची Realme Narzo 10 Series मे महिन्यात भारतात लॉन्च करण्यात आली होती. आज हा फोन पुन्हा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. Realme Narzo 10 चा सेल आज दुपारी 12 वाजता Flipkart & Realme.com वर सुरु होणार आहे. Realme Narzo 10A चे लिमिडेट मॉडल्स या सेलमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामोबाईलवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड याच्यावर 5% डिस्काऊंट देण्यात येणार आहे. तसंच हा मोबाईल खरेदी करताना युजर्स नो कॉस्ट ईएमआय आणि सँडर्ड ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकतात.

Realme Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा मीनी ड्रॉप फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोलूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12MP चा मेन कॅमेरा, 2MP पोट्रेट लेन्स आणि 2MP मॉक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोबाईलमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे., तसंच या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G70 SoC प्रोसेसर असून 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याला 10W चा चार्गिंग सपोर्ट आहे.

Realme Narzo 10A Specifications:

प्रोसेसर MediaTek Helio G70
रॅम 3GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 32GB
बॅटरी 5,000mAh
बॅक कॅमेरा 12MP, 2MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 5MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 10W पॉवर चार्गिंग

Realme Tweet:

हा मोबाईल अॅनरॉईड 10 वर आधारित रियलमी UI ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Realme Narzo 10A हा मोबाईल 'सो ब्लू' आणि 'सो व्हाईट' या दोन शेड्समध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये 3GB रॅम दिला असून 32GB इंटरनल स्टोरेज दिलेला आहे. या मोबाईलमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर दिला असून मोबाईल फक्त 0.27 सेकंदात अनलॉक होतो. Realme Narzo 10A च्या 3GB & 32GB च्या वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.