Realme C25s स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Realme C25s स्मार्टफोन जून महिन्यात लॉन्च होणार आहे. फोन दोन स्टोरेज वेरियंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उतरवला जाणार आहे.
Realme C25s स्मार्टफोन जून महिन्यात लॉन्च होणार आहे. फोन दोन स्टोरेज वेरियंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उतरवला जाणार आहे. चीनी कंपनीने Realme C25s स्मार्टफोन आधीच मलेशिया येथे लॉन्च केला होता. फोनला रिअलमी सी25 चा पॉवरफुल प्रोसेसर दिला गेला आहे. रिअलमी सी25 स्मार्टफोन भारतात गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. हँडसेटमध्ये एक 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. पॉवरबॅकअपसाठी Realme C25s स्मार्टफोनला 6000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन वॉटर ब्लू आणि वॉटर ग्रे रंगात ऑप्शनमध्ये येणार आहे. रिअलमी सी25 एस स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंटला MYR 699 (जवळजवळ 12,200 रुपये) लॉन्च केला आहे.
कंपनीचा हा स्मार्टफोन ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करणार आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+डिस्प्ले सपोर्ट केला जाणार आहे. याचे स्क्रिन रेज्यॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. फोनची स्क्रिन टू बॉडी रेश्ो 88.7 टक्के आहे. फोन एक ऑक्टा कोर MediaTek Helio G84 SoC चा सपोर्ट दिला आहे. Realme C25s ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सुद्धा दिला आहे. त्याचसोबत मॅक्रो लेन्ससाठी 2MP चा कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला आहे.(नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी 'या' स्पेसिफिकेशनवर जरुर लक्ष द्या अन्यथा फसवणूकीला बळी पडाल)
कनेक्टिव्हिटीसाठी Realme C25s स्मार्टफोन मध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5, GPS/ A-GPS, Micro-USB आणि a 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. फोन एक फिंगरप्रिंट सेंसर सपोर्टसह येणार आहे. पॉवरबॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. फोनचे डायमेंन्शन 165.5X75.9X9.6mm आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)