Realme C21Y स्मार्टफोनचा आज दुपारी 12 पासून सेल; खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आज दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनचा सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाईटवर हा सेल सुरु होणार असून तेथून तुम्ही स्मार्टफोनची खरेदी करु शकता.

Realme C21Y Smartphone (Photo Credits: Realme)

रियलमी सी21वाय (Realme C21Y) स्मार्टफोन मागील आठवड्यात भारतात लॉन्च झाला. आज दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनचा सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाईटवर (Realme Official Website) हा सेल सुरु होणार असून तेथून तुम्ही स्मार्टफोनची खरेदी करु शकता. या स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले, 13MP चा AI रियल कॅमेरा, रिव्ह्रर्स चार्जिंग, Unisoc T610 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 OS वर आधारीत Realme UI वर काम करतो. दोन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे- Cross Blue आणि Cross Black.

Realme C21Y हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे- 3GB+32GB आणि 4GB+64GB. 3GB+32GB या वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी असून 4GB+64GB वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत यावर डेबिट ईएमआय आणि क्रेडिट कार्डचा पर्याय निवडल्यास 5 टक्के सूट दिली जात आहे.

Realme Tweet:

Realme C21Y (Photo Credits: Realme)

यात ट्रिपर रियल कॅमेरा सेटअप दिला असून 13MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP चा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आणि 2MP ची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. (Realme C21Y भारतात लॉन्च)

Realme C21Y Smartphone (Photo Credits: Realme)

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा LCD panel डिस्प्ले 1600x720 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. विशेष म्हणजे मायक्रो एसडी कार्डसह या स्मार्टफोनची मेमरी 256GB पर्यंत वाढवण्यात येते.