Realme Anniversary Sale सुरु; रियलमीच्या 'या' प्रॉडक्ट्सवर मिळवा जबरदस्त सूट
रियलमी चा थर्ड अॅनिव्हर्सरी सेल फ्लिपकार्ड, अॅमेझॉन आणि रियलमी. कॉमवर आजपासून सुरु झाला. हा चार दिवसांचा सेल 8 जून रोजी संपेल.
रियलमी चा थर्ड अॅनिव्हर्सरी सेल (Realme Anniversary Sale) फ्लिपकार्ट (Flipkart), अॅमेझॉन (Amazon) आणि रियलमी.कॉम (Realme.com) वर आजपासून सुरु झाला. हा चार दिवसांचा सेल 8 जून रोजी संपेल. या सेलअंतर्गत कंपनी स्मार्टफोन्स, मोबाईल अॅक्सेसरीज आणि अन्य वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट आणि ऑफर्स देत आहे. त्याचबरोबर सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरुन (Citi Bank Debit & Credit Cards) खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर 20000 हून अधिक किंमतीच्या मोबाईलवर ईएमआय (EMI) पर्याय निवडल्यास त्यावर 500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.
Realme X7 Pro 5G:
Realme X7 Pro 5G भारतात लॉन्च झाला असून त्याची किंमत 29,999 इतकी आहे. या सेलमध्ये या फोनवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. त्यामुळे हा फोन 26,999 रुपयांमना मिळेल.
Realme X50 Pro:
मागील वर्षी हा स्मार्टफोन लॉन्च झाला असून 8 GB रॅम+ 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 इतकी होती. मात्र या सेलमध्ये हे वेरिएंट अवघ्या 24,999 रुपयांना मिळत आहे.
Realme Narzo 30 Pro:
हा मोबाईल नुकताच भारतात लॉन्च झाला असून 16,999 रुपयांपासून याची किंमत सुरु होत आहे. सेलअंतर्गत हा मोबाईल 15999 रुपयांपासून विक्त घेऊ शकता.
Realme X3 Super Zoom:
रियलमी एक्स 3 सुपर झुम हा मोाबईल 27999 रुपयांना रियलमी.काॅम आणि फ्लिपकार्डवर उपलब्ध होता. या सेलअंतर्गत मोबाईलची किंमत कमी करुन 21999 रुपये करण्यात आली आहे.
Realme Smartwatch S/ S Pro:
रियलमी स्मार्टवॉट भारतात 4999 रुपयांना लॉन्च झाले होते. या सेल अंतर्गत रियलमी स्मार्टवॉच एस वर 1000 रुपयांचा डिस्काऊंट तर रियलमी स्मार्टवॉच एस प्रो वर 2000 डिस्काऊंट मिळेल.
Realme Buds Air Pro:
रियलमी बर्ड्स एअर प्रो ची किंमत 4,999 रुपये इतकी होती. ती आता सेल दरम्यान कमी करुन 4,499 रुपये करण्यात आली आहे.
रियलमीचे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी ही अत्यंत चांगली संधी आहे. त्यामुळे संधी अजिबात दवडू नका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)