Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोनचा पहिला सेल येत्या 25 मार्चला, फ्लिपकार्टवर प्री-बुकिंग सुरु

या सीरिज अंतर्गत रिअलमी 8 आणि रिलयमी 8 प्रो स्मार्टफोन उतरवणार आहे. हे स्मार्टफोन भारतात येत्या 24 मार्चला लॉन्च केला जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

Realme भारतीय बाजारात आपली नवी Realme 8 सीरिज लॉन्चिंग करण्याच्या तयारीत आहे. या सीरिज अंतर्गत रिअलमी 8 आणि रिलयमी 8 प्रो स्मार्टफोन उतरवणार आहे. हे स्मार्टफोन भारतात येत्या 24 मार्चला लॉन्च केला जाणार आहे. परंतु लॉन्चिंगपूर्वी या फोनच्या फिचर्सबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करुन दिला आहे. युजर्सला ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर जाऊन सीरिजसाठी रजिस्ट्रेशन करु शकतात. त्याचसोबत फ्लिपकार्टवर याच्या सेलच्या तारखेबद्दल ही खुलासा करण्यात आला आहे.

रिअमली 8 आणि रिअलमी 8 प्रो भारतात येत्या 24 मार्चला संध्याकाळी 7.30 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. तर फ्लिपकार्टवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार, हे स्मार्टफोन 25 मार्चला पहिल्या सेलसाठी उपलब्ध करुन दिले जाणार असून सेल दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.(Lava कंपनीने भारतात लाँच केले 3 स्वस्त टॅबलेट्स, किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण)

समोर आलेल्या माहितीनुसार, Realme 8 ची सुरुवाती किंमत 15 हजारांपर्यंत असू शकते. तर Realme 8 Pro भारतात 25 रुपयांच्या सुरुवाती किंमतीला लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र जर तुम्हाला प्री-बुकिंग करायची असल्यास तुम्ही फ्लिपकार्टवक करता येणार आहे. प्री-बुकिंग 22 मार्च पर्यंत असणार आहे. Realme 8 आणि Realme 8 Po खरेदी करण्यासाठी युजर्सला 1080 रुपयांचे फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट वाउचर खरेदी करावे लागणार आहे. त्यानंतर सेलच्या दिवशी लॉग इन करावे लागणार असून एक कूपन मिळणार आहे. फोन खरेदीकेल्यानंतर 10 दिवसांच्या आतमध्ये Realme Buds Air Neo ब्लूटूथ हेडसेट वर सुद्धा सूट दिली जाणार आहे.

Realme 8 आणि  Realme 8 Pro स्मार्टफोन संदर्भात कंपनीने फक्त टीझर जाहीर केला आहे. त्यानुसार,  रिअलमी 8 Pro मध्ये 108 MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनमध्ये सुपर एमोलेड फुल स्क्रिन मिळणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. रिअलमी 8 आणि रिलअमी 8 प्रो स्मार्टफोन MediaTek Helio G95 प्रोसेसवर उतरवला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी 30W चार्जिंग सपोर्ट करणार आहे.